Home देश CJI Surya Kant Advice to Young Lawyers : केवळ कायदेतज्ज्ञ बनू नका, तर समाजाचे ‘संदेशवाहक’ व्हा; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे युवा वकिलांना आवाहन

CJI Surya Kant Advice to Young Lawyers : केवळ कायदेतज्ज्ञ बनू नका, तर समाजाचे ‘संदेशवाहक’ व्हा; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे युवा वकिलांना आवाहन

0
CJI Surya Kant Advice to Young Lawyers : केवळ कायदेतज्ज्ञ बनू नका, तर समाजाचे ‘संदेशवाहक’ व्हा; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे युवा वकिलांना आवाहन
Surya Kant

बंगळुरू : कायद्याच्या क्षेत्रात पाऊल ठेवणारे भावी वकील केवळ पुस्तकी ज्ञानावर मोठे होत नाहीत, तर त्यांच्याकडे न्याय मिळवून देण्याचे धाडस आणि प्रत्येकाचे ऐकून घेण्याची नम्रता असणे गरजेचे आहे, असे अमूल्य मार्गदर्शन भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी नुकतेच केले आहे. बंगळुरू येथील प्रतिष्ठित ‘नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी’ (NLSIU) च्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

दीक्षांत सोहळ्यापूर्वी निर्माण झालेली अनिश्चितता

या कार्यक्रमादरम्यान सरन्यायाधीशांनी नुकत्याच झालेल्या ‘NALSAR’ वादावर आणि त्यांच्या या दौरयाच्या आधी घडलेल्या काही नाट्यमय घडामोडींवर मौन सोडले. ते म्हणाले की, या दीक्षांत सोहळ्याच्या अगदी तोंडावर काही बाह्य घटकांमुळे आणि कटकारस्थानांमुळे मोठे अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले होते. हा सोहळा सुरळीत पार पडेल की नाही, अशी शंकेची पाल मनात चुकचुकत होती. परंतु, अशा बिकट आणि आव्हानात्मक प्रसंगातही विद्यार्थ्यांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य खरोखरच कौतुकास्पद होते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

‘दयेच्या दबावापेक्षा संवादाची ताकद मोठी’

https://www.prahaar.in/2026/10/17/license-of-the-kitchen-at-fortis-hospital-mulund-suspended-fda-takes-action/

विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक करताना सीजेआय सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की, या कॅम्पसच्या प्रतिभावान आणि होतकरू तरुणांनी पुन्हा एकदा हे सिद्ध करून दाखवले आहे की, कोणाच्याही दडपशाहीपुढे प्रामाणिक लोकांचा दृढनिश्चय कधीच झुकत नाही. संकुचित विचारसरणीचे अडथळे बाजूला सारत विद्यार्थ्यांनी खुल्या संवादाचा मार्ग स्वीकारला. काही मोजक्या स्वार्थी लोकांच्या षडयंत्रांपेक्षा इमानदार आणि सत्य बाजूने असणाऱ्या बहुसंख्य विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती नेहमीच भारी ठरते, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.

‘प्रामाणिकपणा हीच तुमची खरी पोचपावती’

विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देताना ते म्हणाले की, तुम्ही कितीही मोठे कायदेतज्ज्ञ झालात, तरी तुमचा प्रामाणिकपणा आणि निष्ठेचे धोरण हीच तुमची उद्याची व्यावसायिक ओळख बनेल. केवळ पैसे कमावणारा व्यावसायिक न बनता समाजातील पिचलेल्या घटकांचे अश्रू पुसणारे, वैयक्तिक स्वातंत्र्याचे खऱ्या अर्थाने रक्षक आणि भारतीय संविधानाचे खरे पाईक बनून काम करण्याची मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. शेवटी विद्यार्थ्यांना प्रेरित करताना सरन्यायाधीशांनी म्हटले की, जेव्हा तुम्ही या ज्ञानमंदिरातून बाहेर पडून प्रत्यक्ष कायदेशीर जगात वावरू लागाल, तेव्हा स्वतःला केवळ एक वकील किंवा कायदेतज्ज्ञ म्हणून मर्यादित ठेवू नका; तर या संपूर्ण समाजासाठी एक ‘आशेचा किरण’ आणि सकारात्मक बदलाचे ‘संदेशवाहक’ व्हा, असा कानमंत्र त्यांनी उपस्थितांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here