Home महाराष्ट्र नाशिक Nashik Crime : नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Nashik Crime : नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
Nashik Crime : नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Nashik Crime : नाशिक शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने आमदार निवासासमोरील चोपडा लॉन्स डोम परिसरात सापळा रचून सुमारे ९५.७०० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) सदृश अंमली पदार्थ जप्त केला. या कारवाईत दुचाकी आणि मोबाईल फोनसह एकूण ४ लाख ६७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पाच संशयितांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस उपनिरीक्षक गणेश देवरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली. रामवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चोपडा लॉन्स डोम परिसरात पोलिसांनी सापळा रचला. यावेळी भूषण रंगनाथ भडांगे (वय २७), राहुल संजय हिंगमिरे (वय २७) आणि जगदीश सोमनाथ चोथे (वय १९) यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे विक्रीसाठी आणलेला एमडी सदृश अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी ९५.७०० ग्रॅम वजनाचा हा पदार्थ जप्त केला. त्याची किंमत सुमारे २ लाख ८७ हजार १०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मुख्य पुरवठादारांचा शोध सुरू

प्राथमिक तपासानुसार, संशयित जगदीश सोमनाथ चोथे याने हा अंमली पदार्थ शिंदे आणि बाळा नावाच्या व्यक्तींकडून विक्रीसाठी आणल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. शहरातील तरुणांपर्यंत अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या साखळीचा तपास करण्यावर पोलिसांचा भर आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश देवरे यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक तलवारे करीत आहेत.

https://www.prahaar.in/2026/10/16/nashik-crime-death-penalty-for-the-monster-vijay-khairnar-sentenced-to-death-in-the-dongrale-girl-sexual-assault-and-murder-case-a-major-verdict-by-the-fast-track-court/

चार लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे.

– एमडी सदृश अंमली पदार्थ: ९५.७०० ग्रॅम, किंमत सुमारे २,८७,१०० रुपये

– दुचाकी: बजाज पल्सर २२० सीसी, किंमत १,५०,००० रुपये

– मोबाईल फोन: ओप्पो, सॅमसंग आणि अॅपल आयफोन, एकूण किंमत ३०,००० रुपये

एकूण जप्त मुद्देमालाची किंमत : ४,६७,१०० रुपये

गुन्ह्यातील संशयितांची नावे

१. भूषण रंगनाथ भडांगे (२७) — रा. मोरे मळा, कृष्णनगर, पंचवटी, नाशिक.

२. राहुल संजय हिंगमिरे (२७) — रा. के.टी.एच.एम. कॉलेजमागे, जोशीवाडा, नाशिक.

३. जगदीश सोमनाथ चोथे (१९) — रा. गोकुळ निवास, दत्तनगर, पेठरोड, पंचवटी, नाशिक.

४. शिंदे नावाचा इसम — रा. नाशिक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here