Home ब्रेकिंग न्यूज “अखेर मनातलं ओठांवर आलंच, हा सगळा खेळ…”; प्रशांत भूषण यांचा व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल

“अखेर मनातलं ओठांवर आलंच, हा सगळा खेळ…”; प्रशांत भूषण यांचा व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल

0
“अखेर मनातलं ओठांवर आलंच, हा सगळा खेळ…”; प्रशांत भूषण यांचा व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल
प्रशांत भूषण यांचा व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल फोटो सौजन्य: देवेंद्र फडणवीस (X Account)

मुंबई: सीजेपी आणि विरोधी पक्षांकडून दिल्लीत सुरू असलेले आंदोलन म्हणजे सत्तेसाठी सुरू असलेला खेळ आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केला. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करत, विद्यार्थ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आधार घेणे, जाती-धर्माच्या तसेच भाषेच्या नावाखाली समाजात द्वेष पसरवणे आणि घटनात्मक संस्थांची प्रतिमा मलीन करणे, हे सर्व सत्तेसाठी सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

https://www.prahaar.in/2026/10/15/minister-shivendrasinhraje-issues-orders-to-complete-the-work-on-the-air-india-building-and-amadar-niwas-on-time/

फडणवीस म्हणाले, “अखेर मनात लपलेली गोष्ट ओठांवर आलीच. देशात अस्थिरता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. सर्व खेळ सत्तेची खुर्ची मिळवण्याचा आहे. मग, त्यासाठी विद्यार्थी, शेतकऱ्यांना चिथावणी द्यावी लागली तरी चालेल. जाती, भाषेच्या नावावर द्वेष परसवावा लागला तरी चालेल. देशाच्या प्रतिष्ठित संस्थांची प्रतिमा मलीन केली जात आहे. आंदोलनाच्या आडून अराजकता पसरवण्याचा यांचा उद्देश आहे”, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही दिल्लीतील अलीकडील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांवर टीका केली आहे. विरोधक तरुणांची दिशाभूल करत असून, लोकशाहीतील घटनात्मक संस्थांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. बांगलादेशातील घडामोडींच्या धर्तीवर भारतातही सरकार बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सिंह यांनी केला.

https://www.prahaar.in/2026/10/15/minister-nitesh-rane-reaction-to-the-yunus-shaikh-case/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here