Home क्रीडा ICC Latest Rankings : श्रेयस अय्यरची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी; ऑस्ट्रेलियाचीही झेप

ICC Latest Rankings : श्रेयस अय्यरची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी; ऑस्ट्रेलियाचीही झेप

0
ICC Latest Rankings : श्रेयस अय्यरची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी; ऑस्ट्रेलियाचीही झेप
श्रेयस अय्यरची क्रमवारीत मोठी झेप (फोटो सौजन्य: ANI)

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) ताज्या कसोटी आणि टी-20 क्रमवारीत मोठे फेरबदल पाहायला मिळाले आहेत. डर्बन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शानदार विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू रेनशॉ आणि जोश हेझलवूड यांनी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. दुसरीकडे, भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम अशा चौथ्या स्थानावर मजल मारली असून, यामुळे आयसीसीच्या अव्वल चार खेळाडूंमध्ये आता भारताचे तीन शिलेदार समाविष्ट झाले आहेत.

https://www.prahaar.in/2026/10/14/shikhar-dhawan-warns-legal-action-misuse-name-pakistan-players-link/

कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा डबरा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू रेनशॉने पहिल्या डावात 190 आणि दुसऱ्या डावात 82 धावांची धमाकेदार खेळी केली. या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर त्याची कसोटी फलंदाजी क्रमवारीत 100 च्या बाहेरून थेट संयुक्त 49 व्या स्थानी धडक झाली आहे. तसेच, डर्बन कसोटीत शेवटच्या दिवशी 6 बळी आणि 49 धावा (6/49) अशी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवणारा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दोन स्थानांच्या सुधारणेसह सातव्या स्थानी पोहोचला आहे. त्याचा साथीदार मिचेल स्टार्क कसोटी गोलंदाजांच्या यादीत आपले अव्वल स्थान राखून आहे. याशिवाय भारताचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा कसोटी अष्टपैलूंच्या यादीत अद्यापही नंबर वन विराजमान आहे.

https://www.prahaar.in/2026/10/14/denmark-open-pvsindhu-lakshyasen-knocked-out-first-round-india-setback/

श्रेयस अय्यरची ऐतिहासिक झेप

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत भारताचा दबदबा आणखी वाढला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरगुती मालिकेतील पहिल्याच सामन्यात शानदार शतक झळकावणाऱ्या श्रेयस अय्यरने क्रमवारीत तीन स्थानांची घसघशीत प्रगती करत थेट चौथे स्थान पटकावले आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे आता टी-20 फलंदाजीच्या शीर्ष चार स्थानांपैकी तीन स्थानांवर भारतीय खेळाडूंचेच वर्चस्व आहे. यामध्ये ईशान किशन पहिल्या, तर आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. पाकिस्तानचा कर्णधार साहिबजादा फरहान तिसऱ्या स्थानावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here