Home ब्रेकिंग न्यूज JVPD उड्डाणपुलाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांकडून पाहणी, पूल केव्हापासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार?

JVPD उड्डाणपुलाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांकडून पाहणी, पूल केव्हापासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार?

0
JVPD उड्डाणपुलाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांकडून पाहणी, पूल केव्हापासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार?
JVPD उड्डाणपुलाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांकडून पाहणी फोटो सौजन्य: mybmc (X Account)

मुंबई: मुंबई शहरामध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच गडद होत चालला आहे. केव्हाही शहरामध्ये प्रवास करा, कायमच मुंबईकरांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतोच. 15 ते 20 मिनिटांच्या रस्त्यासाठी नागरिकांना पाऊण ते एक तास वाहतूक कोंडीमध्ये अडकून राहावं लागतं. BMC कडून आणि राज्य सरकारकडून अनेक उड्डाणपुलांचे आणि मेट्रोचे काम हाती घेण्यात आले आहे. मुंबई आणि उपनगरामध्ये विकास काम सुरू असताना आणखी एक उड्डाणपूलाचं काम आता हाती घेण्यात आलं आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलापासून जुहू- वेसावे जोड रस्त्या पर्यंत जेव्हीपीडी उड्डाणपूल उभारण्यात येत आहे.

https://www.prahaar.in/2026/10/14/memorial-for-dr-br-ambedkar-is-to-be-constructed-in-thane-district-deputy-speaker-legislative-assembly-anna-bansode-has-directed-that-a-proposal-for-the-memorials-construction-be-submitted/

वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अंधेरी पश्चिमेतील सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलापासून जुहू- वेसावे जोड रस्त्यापर्यंत जेव्हीपीडी (जुहू- विलेपार्ले डेव्हलपमेंट स्कीम) उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या पूल प्रकल्पस्थळाला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. शिवाय, कामाची प्रगती, वाहतूक बदल आणि बांधकाम पूर्ण करण्याची कालमर्यादा याबाबत आढावा घेत विविध निर्देश दिले. जेव्हीपीडी उड्डाणपुलाची लांबी 1750 मीटर (1.75 किलोमीटर) असून रुंदी 15.10 मीटर आहे. प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी कालावधी 31 मार्च 2028 पर्यंत आहे. मात्र, 31 डिसेंबर 2027 पर्यंत उड्डाणपूल सुरू करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले.

उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी 600 मिलीमीटर आणि 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिन्यांचे सुमारे 400 मीटर लांबीमध्ये स्थलांतर करणे, 1200 मिलीमीटर व्यासाच्या मलवाहिनीचे सूक्ष्म बोगदा तंत्रज्ञान (Microtunneling) पद्धतीने स्थलांतर करणे, 300 मिलीमीटर व्यासाची मलवाहिनी स्थलांतरित करून नव्याने टाकणे आणि मेट्रो मार्गिका 2 B च्या कामाशी समन्वय साधून उड्डाणपुलाचे बांधकाम करणे ही या प्रकल्पातील प्रमुख आव्हाने आहेत. शिवाय, मेट्रो स्थानकाखाली गर्डर बसविण्यासाठी त्यांना आडव्या दिशेने सरकविण्याच्या विशेष तंत्राचा वापर करणे, 90 फूट जंक्शन येथे 72 मीटर लांबीचा कमानीच्या आकाराचा पूल (Arch Bridge) उभारणे हे महत्त्वाचे अभियांत्रिकी आव्हान आहे. जुहू सर्कल परिसरात कमीत कमी खांब उभारावे लागतील, अशा पद्धतीने विशेष लांबीचा स्पॅन तयार करणे, हे देखील महत्त्वाचे काम आहे.

https://www.prahaar.in/2026/10/14/flex-free-mumbai-campaign-gets-start-bmc-mayor-ritu-tawde/

उड्डाणपुलाचे काम मार्गी लावण्यासाठी प्रकल्पाची 3 टप्प्यात विभागणी करण्यात येणार आहे. त्यासाठी वेगळी टीम नेमून सर्वांना एकत्रित कामे पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बांगर यांनी दिले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली की, “पश्चिम उपनगरातील रस्ते संपर्क अधिक सुलभ करणे आणि प्रमुख चौकांवरील वाहनांचा ताण कमी करणे, हा या पूल प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. प्रस्तावित वेसावे- वांद्रे सागरी सेतू आणि मुंबई किनारा रस्ता (उत्तर) दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठीही हा उड्डाणपूल महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील पाच प्रमुख वाहतूक जंक्शन टाळता येणार आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गर्दीच्या वेळेत सुमारे 45 मिनिटे लागणारा प्रवास 20 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. एकूणच जेव्हीपीडी उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर जुहू, विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा परिसरातील प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here