Home क्रीडा IPL 2027: सौरव गांगुलीचा मास्टरस्ट्रोक; दिल्लीच्या ताफ्यात सामील झाला भारताचा सर्वात मोठा चॅम्पियन!

IPL 2027: सौरव गांगुलीचा मास्टरस्ट्रोक; दिल्लीच्या ताफ्यात सामील झाला भारताचा सर्वात मोठा चॅम्पियन!

0
IPL 2027: सौरव गांगुलीचा मास्टरस्ट्रोक; दिल्लीच्या ताफ्यात सामील झाला भारताचा सर्वात मोठा चॅम्पियन!
IPL 2027: सौरव गांगुलीचा मास्टरस्ट्रोक; दिल्लीच्या ताफ्यात सामील झाला भारताचा सर्वात मोठा चॅम्पियन! (Photo: ANI)

टी20 क्रिकेटमध्ये एक काळ गाजवलेला आणि अभिषेक शर्मा-प्रभसिमरन सिंगसारख्या खेळाडूंना घडवणाऱ्या युवराज सिंगकडे मोठी जबाबदारी आली आहे. आयपीएल 2027 स्पर्धेसाठी दिल्ली कॅपिटल्स संघासोबत आता नवी इनिंग सुरू करणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने युवराज सिंगला असिस्टंट प्रशिक्षक आणि बॅट कोच म्हणून जबाबदारी सोपवली आहे. युवराज सिंग आणि दिल्ली कॅपिटल्स यांचं नातं खूप जुनं आहे. या फ्रेंचायझीसठी युवराज सिंग 2015 मध्ये खेळला आहे. तेव्हा दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यासाठी 16 कोटी रुपये मोजले होते. पण एक पर्वानंतरच त्याला रिलीज केलं होतं. आता युवराज सिंग पुन्हा एकदा या फ्रेंचाझसोबत जोडला गेला आहे. युवराज सिंग आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसोबत या संघाची बांधणी करणार आहे. या फ्रेंचायझीने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकदाही जेतेपद पटकावलेलं नाही. त्यामुळे सौरव गांगुली आणि युवराज सिंगकडून आता फार अपेक्षा आहेत.

दिल्ली कॅपिटल्सचा बॅटिंग कोच झाल्यानंतर युवराज काय म्हणाला?

युवराज सिंग दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांना फलंदाजीचे धडे देणार आहे. युवराज सिंग आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. क्रिकेटच्या छोट्या फॉर्मेटमध्ये त्याची तशी गरजही आहे. त्याच्या मार्गदर्शनाखालीच अभिषेक शर्मा, शुभमन गिल आणि प्रभसिमरन सिंग सारख्या खेळाडूंनी धडे गिरवले आहेत. युवराज सिंग म्हणाला की, ‘या फ्रँचायझीसोबत माझा खूप जुना संबंध आहे आणि मी मालकांना चांगले ओळखतो, त्यामुळे ही माझ्यासाठी एक विशेष संधी आहे. मी प्रशिक्षक म्हणून दादा यांच्यासोबत काम करण्यासही उत्सुक आहे.’ युवराज सिंग पुढे म्हणाला की, ‘प्रशिक्षण ही माझी खूप आवड आहे आणि या अत्यंत प्रतिभावान संघासोबत कामाला सुरुवात करण्यास मी उत्सुक आहे.’

https://www.prahaar.in/2026/10/13/aus-vs-sa-australia-defeated-south-africa-by-214-runs-in-the-first-test-team-india-to-benefit-regarding-the-world-test-championship-2027/

युवराज सिंगचा अनुभव

युवराज सिंगने टी20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच सहा चेंडूत सहा षटकार मारले होते. अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरला. यानंतर अनेकांना हा विक्रम केला, पण पहिला विक्रम युवराज सिंगच्या नावावर राहिला. युवराज सिंगने आयपीएलमध्ये 132 सामने खेळले आणि 2750 धावा केल्या आहे. त्याने आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 कसोटी, 304 वनडे आणि 58 टी20 सामने खेळले आहे. युवराज सिंगने 2007 टी20 वर्ल्डक आणि 2011 वनडे वर्ल्डकप विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here