Home ब्रेकिंग न्यूज Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये संतापजनक घटना, मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये संतापजनक घटना, मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

0
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये संतापजनक घटना, मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल
पिंपरी चिंचवडमध्ये संतापजनक घटना, मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल (Photo Google)

पुणे : पिंपरी चिंचवडमधील निगडी परिसरातील मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे राज्यात संताप व्यक्त केला जात असून, मुलीच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.  (Pimpri-Chinchwad)

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दर्शन घेतल्यानंतर ती बाहेर जात असताना तेथे काम करणाऱ्या एका कामगाराने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. आरोपी एका ठेकेदाराकडे रोजंदारीवर काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

https://www.prahaar.in/2026/10/12/kasara-12-day-special-traffic-power-block-railway-services-affected/

आरोपी घटनास्थळावरून फरार

या प्रकाराला मुलीने विरोध केला आणि ती जोरजोरात रडू लागली. तिचा आवाज ऐकून इतर लोक मंदिरात येतील, या भीतीने आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. मंदिरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.

संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, निगडी पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत संशयित कामगाराला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात विनयभंगासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी तसेच धार्मिक स्थळांवर मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना अधिक प्रभावी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here