Home महाराष्ट्र ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत ठाणेकरांशी संवाद साधणार, महा मेट्रोचे संचालक मुलाखतीतून देणार उत्तर

रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत ठाणेकरांशी संवाद साधणार, महा मेट्रोचे संचालक मुलाखतीतून देणार उत्तर

0
रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत ठाणेकरांशी संवाद साधणार, महा मेट्रोचे संचालक मुलाखतीतून देणार उत्तर
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

ठाणे: ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबद्दल ठाणेकरांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. ठाणेकरांच्या मनामध्ये असलेल्या शंकांचं निरसन रोटरी क्लब ऑफ ठाणेकडून येत्या गुरूवारी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर करणार आहेत.. येत्या गुरूवारी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये सायंकाळी सात वाजता जाहीर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून ठाणेकरांना विनामुल्य प्रवेश असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरामध्ये रिंग रोड मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. प्रकल्पामुळे ठाणेकरांच्या मनात असणाऱ्या शंकांचे निरसन करण्यासाठी खास करून ह्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलं आहे.

https://www.prahaar.in/2026/10/13/maharashtra-at-the-forefront-of-creating-an-investment-ecosystem-for-industries-chief-minister-devendra-fadnavis/

जाहीर मुलाखत घेण्यामागील कारण म्हणजे, रिंग मेट्रोबद्दल अजूनही ठाणेकरांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. रिंग रोड मेट्रोचा मार्ग कसा असेल? मेट्रो प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा कोणाला? यासह अनेक वेगवेगळे मनामध्ये असलेल्या प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी या जाहीर मुलाखतीचे नियोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर मुलाखत घेणार आहेत. दरम्यान, 29 किमी लांबीच्या वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाचे उद्दिष्ट ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत परिवर्तन घडवणे आहे. वाढते शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ही मेट्रो सुरू केली जात आहे.

https://www.prahaar.in/2026/10/13/proposal-to-install-a-roof-on-the-santacruz-skywalk-remains-stalled-all-eyes-on-bmc-standing-committee-approval/

मार्गाची अचूक आखणी, स्थानक नियोजन, प्रकल्पाची आवश्यकता, अंमलबजावणीची कालमर्यादा आणि प्रवासावर होणारा एकूण परिणाम यांसह अनेक प्रश्न ठाणेकरांच्या मनात आहेत. ‘महा मेट्रो’ने यापूर्वी, नागपूर आणि पुणे येथे मेट्रो मार्ग बांधले असून त्या मार्गांच्या विस्ताराचे काम सध्या सुरू आहे. तसेच, नवी मुंबईतील मेट्रो मार्गाच्या कामकाजाचे संचालनही महामेट्रोने केले आहे. मुलाखतीचा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य आहे. प्रथम येणार्‍यास प्राधान्य या तत्वावर विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. पुढच्या काही रांगा रोटरी क्लबच्या सदस्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here