Home ब्रेकिंग न्यूज Eknath Shinde : दिल्लीतील मोर्चामागे परकीय शक्तींचा हात – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोप

Eknath Shinde : दिल्लीतील मोर्चामागे परकीय शक्तींचा हात – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोप

0
Eknath Shinde : दिल्लीतील मोर्चामागे परकीय शक्तींचा हात – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोप
दिल्लीतील मोर्चामागे परकीय शक्तींचा हात - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोप (Photo X)

राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर निशाणा

मुंबई : दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने काढण्यात आलेल्या मोर्चावर टीका करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आंदोलनामागे परकीय शक्ती आणि आंतरराष्ट्रीय कटकारस्थान असण्याची शंका व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत त्यांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा निषेध केला. लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार असला, तरी न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी मोर्चा काढण्याची पद्धत योग्य आहे का, असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला. (Delhi Protest)

दिल्लीतील मोर्चाबाबत प्रतिक्रिया देताना शिंदे यांनी हा दिवस देशाच्या इतिहासातील ‘काळा दिवस’ असल्याचे म्हटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातून उभ्या राहिलेल्या घटनात्मक संस्थांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. भारताच्या न्यायव्यवस्थेवर हा हल्ला असल्याचे सांगत, संबंधितांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. (Eknath Shinde)

https://www.prahaar.in/2026/10/13/outrageous-incident-in-pimpri-chinchwad-attempt-to-molest-a-minor-girl-who-had-visited-a-temple-for-darshan-video-goes-viral/

विरोधकांकडून संविधान नष्ट करण्याचा आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. देशाला अराजकतेकडे नेण्याचे काम सुरू आहे. हे देशासाठी घातक आहे. निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विजय मिळवता येत नसल्यामुळे विरोधक अशा प्रकारची आंदोलने करत आहेत. या आंदोलनात परकीय शक्तींचा सहभाग असल्याचा आरोप करताना, देशाला अस्थिर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कटकारस्थान रचले जात असल्याची शंका शिंदे यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here