Home फोटो गॅलरी IND vs WI: फक्त 25 धावा करताच अभिषेक शर्माच्या शिरपेचात खोवला जाणार मानाचा तुरा, असं करणारा दुसरा भारतीय ठरणार

IND vs WI: फक्त 25 धावा करताच अभिषेक शर्माच्या शिरपेचात खोवला जाणार मानाचा तुरा, असं करणारा दुसरा भारतीय ठरणार

0
IND vs WI:  फक्त 25 धावा करताच अभिषेक शर्माच्या शिरपेचात खोवला जाणार मानाचा तुरा, असं करणारा दुसरा भारतीय ठरणार
वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारताने या मालिकेतील तीन सामन्यानंतर 2-1 ने आघाडी घेतली आहे. आता 14 ऑक्टोबरला हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये चौथा टी20 सामना होणार आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवला तर मालिका खिशात घालेल.(Photo: ANI)
वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. अभिषेक शर्मासाठी हैदराबादचं मैदान काही नवीन नाही. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्याने अनेक विक्रम या मैदानात रचले आहेत. त्यामुळे या सामन्यात त्याची बॅट तळपली तर टी20 क्रिकेटमध्ये या मैदानात 1000 धावा करणारा फलंदाज ठरेल. त्याला यासाठी फक्त 25 धावांची गरज आहे. (Photo: ANI)
टी20 क्रिकेटमध्ये हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये शिखर धवने 1000 हून अधिक धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा भारताचा एकमेव फलंदा आहे. आता अभिषेक शर्माने चौथ्या टी20 सामन्यात 25 धावा केल्या तर अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरेल. (Photo: ANI)
हैदराबादच्या या मैदानात मागची आकडेवारी पाहता अभिषेक शर्माला रोखणं सोपं नाही. अभिषेक शर्माने या मैदानात 31 टी20 डाव खेळला आहे. यात त्याने 975 धावा केल्या आहेत. (Photo: ANI)
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात अभिषेक शर्माचा स्ट्राईक रेट हा 211.03 चा आहे. त्याने या मैदानात 2 शतकं आणि सात अर्धशतकं ठोकली आहेत. यासह त्याने 93 चौकार आणि 71 षटकार मारले आहेत. (Photo: ANI)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here