Home ब्रेकिंग न्यूज Marathi actor madhutai kambikar: ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन, मराठी कलाविश्वात पुन्हा एकदा शोककळा

Marathi actor madhutai kambikar: ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन, मराठी कलाविश्वात पुन्हा एकदा शोककळा

0
Marathi actor madhutai kambikar: ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन, मराठी कलाविश्वात पुन्हा एकदा शोककळा
madhutai kambikar death

मुंबई : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन. १२ ऑक्टोबर २०२६ ला लावणी सम्राधनी मधू कांबीकर यांनी मराठी चित्रपट सृष्टीचा घेतला अखेरचा निरोप. मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि लोककलेच्या क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजनविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.(madhu tai kanbikar)

https://www.prahaar.in/2026/10/10/sachin-pilgaonkar-and-madhurani-gokhale-starrer-kapuskoonda-marathi-movie-teaser-release/

मधू कांबीकर यांचा जन्म २८ जुलै १९५३ रोजी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माळेगाव येथे झाला. त्यांचे मूळ नाव मधू वामन जाधव असे होते. लहानपणापासूनच त्यांचा लोककलेकडे ओढा होता. वडिलांच्या कलाक्षेत्रातील सहभागामुळे त्यांना लहान वयातच कलेची ओळख झाली.
लावणी आणि अभिनयाचा प्रवासमधू कांबीकर यांनी लावणी, लोकनाट्य, नाटक आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून आपली कारकीर्द घडवली. पारंपरिक लावणी सादर करण्याची त्यांची शैली, हावभाव आणि अभिनय यांमुळे त्यांनी रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले.
त्यांना खरी ओळख ‘शापित’ या मराठी चित्रपटातून मिळाली. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या भूमिका साकारल्या. (madhu tai

https://www.prahaar.in/2026/10/09/amitabh-bachchan-gets-emotional-remembering-nana-patekar-shares-his-feelings-on-the-kbc-stage/

त्यांनी शापित, हेच माझे माहेर, एक होता विदूषण, रावसाहेब, झपाटलेला, डेबू, संघर्ष जीवनाचा अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी ग्रामीण जीवन, स्त्रीजीवनातील संघर्ष आणि विविध भावभावना प्रभावीपणे पडद्यावर साकारल्या.

पुरस्कार आणि सन्मान:

मधू कांबीकर यांना त्यांच्या अभिनयासाठी महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार मिळाले. ‘शापित’, ‘हेच माझे माहेर’ आणि ‘संघर्ष जीवनाचा’ यांसारख्या चित्रपटांतील भूमिकांसाठी त्यांचा गौरव करण्यात आला. गुजराती चित्रपट ‘साद’मधील अभिनयासाठीही त्यांना गुजरात राज्याचा पुरस्कार मिळाला.
पारंपरिक लावणीच्या जतनासाठी योगदानमधू कांबीकर यांनी केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे, तर लावणी कलावंत म्हणूनही महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी पारंपरिक लावणीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी ‘सखी माझी लावणी’ हा कार्यक्रम सादर केला. या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या लोककलेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम केले.

मधू कांबीकर यांनी आपल्या अभिनयातून आणि लावणी कलेतून मराठी संस्कृतीचा समृद्ध वारसा जपला. चित्रपट, नाटक आणि लोककलेच्या माध्यमातून त्यांनी रसिकांच्या मनावर आपली वेगळी छाप उमटवली. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वातील एक अनुभवी आणि प्रतिभावंत कलाकार काळाच्या पडद्याआड गेली आहे. राजकीय क्षेत्रातून बातमी समोर आली असून शोककळा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here