Home ब्रेकिंग न्यूज Pune Water Cut: पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट, आठवड्यातून ‘या’ दिवशी राहणार पाणी पुरवठा बंद

Pune Water Cut: पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट, आठवड्यातून ‘या’ दिवशी राहणार पाणी पुरवठा बंद

0
Pune Water Cut: पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट, आठवड्यातून ‘या’ दिवशी राहणार पाणी पुरवठा बंद
फोटो सौजन्य: ANI न्यूज

पुणे: पावसाने दिलेली ओढ आणि आगामी पावसाबाबतची अनिश्चितता लक्षात घेऊन उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या आदेशानंतर पुणे महानगर पालिकेने शहरामध्ये आठवड्यातून एक दिवसासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून अर्थात गुरूवारपासून शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. आठवड्यातील प्रत्येक गुरूवारी पुणे शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. यामुळे नागरिकांनी आपले दररोजचे पाण्याचं नियोजन करूनच वापरण्याचा सल्ला पुणे महानगर पालिकेने नागरिकांना दिले आहे.

https://www.prahaar.in/2026/10/12/provide-assistance-to-fishermen-during-the-drought-without-imposing-additional-criteria-minister-nitesh-ranes-directive/

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याची स्थिती लक्षात घेता राज्य सरकारने महानगर पालिकेला पाणी कपातीचे निर्देश दिले आहेत. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आज (12 ऑक्टोबर, सोमवार) झालेल्या बैठकीत शहरातल्या धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेत पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता पुणेकरांना 2027 च्या पावसाळ्यापर्यंत पाणीकपातीला सामोरे जावे लागणार हे मात्र नक्की. राज्य सरकारने पुणे महानगर पालिकेला दिलेल्या आदेशानुसार, महानगर पालिका क्षेत्रात 40 टक्के पाणी कपात करावी असे पत्र शुक्रवारी पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला पाठवले होते.

https://www.prahaar.in/2026/10/12/election-commission-extends-deadline-voter-list-revision-special-intensive-investigation-sir-maharashtra/

आता त्याप्रमाणे शहरामध्ये पाणी कपात केली जाणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर शहरामध्ये पाणी कपातीची घोषणा केलीतर नागरिकांचं पाण्याचं नियोजन पूर्णपणे कोलमडणार, हे मात्र नक्की. पाण्याचं गणित कोलमडू नये आणि तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागू नये, म्हणून महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाने दिलेल्या निर्देशानुसार, शहरामध्ये एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रत्येक आठवड्यातील गुरूवारी पुणे शहराला पाणी पुरवठा बंद असणार आहे. त्या प्रमाणे नागरिकांनी आधीच पुरेल तेवढा पाणी पुरवठा साठवून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

https://www.prahaar.in/2026/10/12/chandrakant-patil-directs-universities-not-to-charge-exam-fees-drought-affected-students/

शिवाय, पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील उपलब्ध पाणीसाठा, शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्याप्रमाणे पाण्याची वाढती मागणी सोबतच पुढील दिवसांच्या पाण्याचे नियोजन अशा सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन महापालिकेने पाणी कपातीची घोषणा केली आहे. सोबतच नागरिकांना पुढच्या वर्षीचा पावसाळा येईपर्यंत पाण्याचा वापर काढकसरीने करण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here