Home फोटो गॅलरी शानदार.. जबरदस्त.. जिंदाबाद..! अभिषेक शर्माने सूर्यकुमार यादवचा मोठा विक्रम मोडला, काय ते जाणून घ्या

शानदार.. जबरदस्त.. जिंदाबाद..! अभिषेक शर्माने सूर्यकुमार यादवचा मोठा विक्रम मोडला, काय ते जाणून घ्या

0
शानदार.. जबरदस्त.. जिंदाबाद..! अभिषेक शर्माने सूर्यकुमार यादवचा मोठा विक्रम मोडला, काय ते जाणून घ्या
टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज अभिषेक शर्माच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याने टी20 आंतरराष्ट्रीय आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. (Photo: ANI)
वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माने षटकार मारत 33 धावांचा पल्ला गाठला आणि एक मोठा पल्ला गाठला. त्याने टीम इंडियासाठी खेळताना 2000 धावा पूर्ण केल्या. (Photo: ANI)
अभिषेक शर्माने टी20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 2000 धावांचा पल्ला गाठणारा फलंदाज ठरला. त्याने 1024 चेंडूत ही कामगिरी केली आहे. तसेच सूर्यकुमारचा विक्रम मोडीत काढला आहे. सूर्यकुमार यादवने 1064 चेंडूत हा पल्ला गाठला होता. (Photo: ANI)
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माने 18 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्याने पॉवरप्लेमध्येच ही कामगिरी केली. (Photo: ANI)
अभिषेक शर्माने पॉवरप्लेमध्ये अर्धशतक ठोकण्याचा विक्रम सातव्यांदा केला आहे. रोहित शर्माने दोन वेळा, इशान किशनने दोन वेळा, यशस्वी जयस्वालने 1 वेळा, केएल राहुलने 1 ववेळा आणि संजू सॅमसनने 1 वेळा अशी कामगिरी केली आहे.(Photo: ANI)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here