मुंबई: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान काळवीट प्रकरणामुळे कमालीचा चर्चेत राहिला आहे. अभिनेत्याच्या ह्या प्रकरणावर ‘काला हिरण : बॅटल फॉर लेगसी’ (Blackbuck: Battle for Legacy) चित्रपट काढण्यात येणार आहे. अभिनेत्याने गेल्या काही महिन्यांपूर्वी ‘काला हिरण : बॅटल फॉर लेगसी’ चित्रपटावर स्थगिती आणण्यासाठी खटला दाखल केला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या निर्मात्याने दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी सलमान खानला चार आठवड्यांची मुदत दिली आहे.
https://www.prahaar.in/2026/10/09/drishyam-3-movie-bollywood-actor-ajay-devgn-become-first-to-give-3-hits-after-covid-19-drishyam-2-and-shaitaan/
सलमान खानने चित्रपटावर स्थगिती आणण्यासाठी दाखल केलेला खटला मागे घेण्याची मागणी, ‘काला हिरण’च्या निर्मात्यांनी न्यायालयामध्ये केली आहे. निर्मात्यांच्या वकिलाने कोर्टामध्ये युक्तिवाद केला की, सलमान खानने दाखल केलेल्या खटल्याच्या बाबतीत दिल्ली न्यायालयाला प्रादेशिक अधिकारक्षेत्र नाही. या प्रकरणावर न्यायालयाने सलमानकडून उत्तर मागितले आहे. अभिनेत्याला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने चार आठवड्यांचा अवधी दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
https://www.prahaar.in/2026/10/09/veteran-theatre-personality-sai-paranjpye-named-for-the-prestigious-vishnudas-bhave-gaurav-padak-award-presentation-ceremony-to-be-held-in-sangli-on-november-5/
सलमान खानने ‘काला हिरण’चा टीझर रिलीज झाल्यानंतरच दिल्ली हाय कोर्टामध्ये धाव घेतली होती. सलमानने टीझर पाहून निर्मात्यांवर आरोप केलाय की, चित्रपटात एक असे पात्र आहे जे त्याच्यासोबत मिळतेजुळते आहे. त्या पात्राकडेही सलमान खान सारखेच ब्रेसलेट सुद्धा आहे. चित्रपटाचे कथानक त्याला समोर ठेवून लिहिण्यात आले आहे. त्याच्या परवानगीशिवाय चित्रपटात त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा वापर करण्यात आल्याचा दावा सलमान खानने कोर्टामध्ये केला आहे. 1998 साली झालेल्या काळवीट शिकार प्रकरणावर आधारित चित्रपटाचे कथानक आहे.
https://www.prahaar.in/2026/10/09/amitabh-bachchan-gets-emotional-remembering-nana-patekar-shares-his-feelings-on-the-kbc-stage/
काळवीट शिकार प्रकरणाशी सलमान खानचे नाव गेल्या अनेक वर्षांपासून जोडलेले आहे. सलमान खानने कोर्टामध्ये दिलेल्या जबाबात म्हटलेय की, त्याच्या आयुष्याभोवतीचा वाद चित्रपटाच्या कथानकात समाविष्ट केला जात आहे आणि त्याचा वापर चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी केला जात आहे. अभिनेत्याचे असे म्हणणे आहे की, यामुळे त्याच्या प्रतिमेला हानी पोहोचू शकते आणि त्याच्या व्यक्तिमत्व हक्कांचे उल्लंघन होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक भरत एस. श्रीनेत यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे कथानक सलमान खानशी निगडीत नाही. चित्रपटातील पात्र ‘अयान खान’ नावाचे एक काल्पनिक पात्र आहे. ब्रेसलेटविषयी बोलताना दिग्दर्शकांनी सांगितले की, असं ब्रेसलेट घालणारा सलमान खान एकटाच नाही. अभिनेत्याला सलमान खानसारखे दिसण्यासाठी कोणत्याही प्रोस्थेटिक मेकअपचा वापर करण्यात आला नाही. २७ जुलै रोजी, दिल्ली उच्च न्यायालयाने सलमान खानच्या आक्षेपावरून चित्रपटासंबंधित सर्व ऑनलाइन लिंक्स काढून टाकण्याचे अंतरिम आदेश देण्यात आले होते.