मुंबई: नितेश तिवारी दिग्दर्शित, ‘रामायण’ या बहुचर्चित चित्रपटातील आणखी दोन महत्त्वाच्या पात्रांचे पोस्टर समोर आले आहेत. अभिनेत्री लारा दत्ता राणी कैकेयीच्या, तर अभिनेत्री शीबा चढ्ढा मंथरेच्या भूमिकेत दिसणार आहे. काही तासांपूर्वीच चित्रपटातील पात्रांचे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झाले आहेत. रिलीज झालेल्या ह्या पोस्टरमुळे चित्रपटातील कलाकारांच्या लूकची आणि त्यांच्या भूमिकांची चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
https://www.prahaar.in/2026/10/10/sachin-pilgaonkar-and-madhurani-gokhale-starrer-kapuskoonda-marathi-movie-teaser-release/
अभिनेत्री लारा दत्ता चित्रपटात अयोध्येची राणी कैकेयीची भूमिका साकारणार आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये अभिनेत्री पारंपरिक राजेशाही वेशभूषेत आणि भरजरी दागिन्यांमध्ये दिसत आहेत. कैकेयी ही राजा दशरथ यांच्या पत्नींपैकी एक आणि भरताची आई होती. रामायणातील कथेनुसार, कैकेयीने राजा दशरथ यांच्याकडे दोन वरदानांची मागणी केली होती. त्यापैकी एका वरदानामुळे प्रभू श्रीरामांना चौदा वर्षांचा वनवास स्वीकारावा लागला. त्यामुळे रामायणाच्या कथानकात कैकेयीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
View this post on Instagram
अभिनेत्री शीबा चढ्ढा या चित्रपटात मंथरेच्या भूमिकेत दिसणार आहेत. पोस्टरमध्ये मंथरेच्या हातात काठी असून, त्यांचा गंभीर आणि प्रभावी लूक पाहायला मिळतो. रामायणाच्या कथेनुसार, मंथरेने कैकेयीला रामाऐवजी भरतला राज्य मिळावे आणि रामाला वनवासात पाठवावे, अशी मागणी करण्यासाठी प्रवृत्त केले होते. मंथरेच्या सल्ल्यामुळे कैकेयीने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम संपूर्ण रामायणाच्या कथानकावर झाला. त्यामुळे मंथरेचे पात्रही चित्रपटाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. चित्रपटातील दोन्ही अभिनेत्रींचे लूक चर्चेत आल्यामुळे चाहते चित्रपटासाठी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.
https://www.prahaar.in/2026/10/10/bharat-jadhav-and-pushkar-shrotri-face-off-in-a-legal-battle-kon-yashwant-pansare-is-set-to-premiere-on-zee5-marathi/
‘रामायण’ चित्रपट दोन पार्टमध्ये रिलीज होणार आहे, त्याचा पहिला पार्ट दिवाळी 2026 मध्ये तर दुसरा पार्ट दिवाळी 2027 मध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटात रणबीर कपूर आणि साई पल्लवीसह यश, सनी देओल, रवी दुबे, अरुण गोविल, लारा दत्ता आणि शिबा चढ्ढासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.