Home ब्रेकिंग न्यूज Panama Earthquake : पनामा भूकंपाने हादरले 9 देश! आता त्सुनामीचा इशारा; नेमकं काय घडलं?

Panama Earthquake : पनामा भूकंपाने हादरले 9 देश! आता त्सुनामीचा इशारा; नेमकं काय घडलं?

0
Panama Earthquake : पनामा भूकंपाने हादरले 9 देश! आता त्सुनामीचा इशारा; नेमकं काय घडलं?
पनामा भूकंप (फोटो सौजन्य: ANI News)

पनामामध्ये शुक्रवारी सकाळी 7.6 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाल्यामुळे मध्य आणि दक्षिण अमेरिकेत मोठी खळबळ उडाली होती. या भूकंपाची तीव्रता पाहता अमेरिकेच्या त्सुनामी इशारा प्रणालीकडून सुरुवातीला पनामा, कोलंबिया, कोस्टा रिका, इक्वेडोर, पेरू, निकाराग्वा, ग्वाटेमाला, एल साल्वाडोर आणि मेक्सिको या 9 देशांना त्सुनामीचा धोका वर्तवण्यात आला होता. मात्र, दिलासादायक बातमी म्हणजे आता हा त्सुनामीचा धोका पूर्णपणे टळला आहे. राष्ट्रीय हवामान सेवेने समुद्राजवळ सतर्क राहण्याचा आणि सामान्य सुरक्षा खबरदारी बाळगण्याचा सल्ला दिला असून इतर कोणतीही भीतीदायक कारवाई किंवा धोक्याची शक्यता उरलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

कुठे होता भूकंपाचा केंद्रबिंदू?

• तीव्रता: 7.6 (युएसजीएसनुसार सुरुवातीला 8.0 वर्तवली गेली, नंतर सुधारणा करण्यात आली).

• केंद्रबिंदू: पनामाच्या दक्षिण टोकाजवळ, ला पिटालोझा अरिबा या ग्रामीण वस्तीच्या नैऋत्येस सुमारे 10 किलोमीटर अंतरावर.

• परिणाम: पनामा सिटी आणि कोस्टा रिकाच्या राजधान्यांमध्ये तीव्र धक्के जाणवले, ज्यामुळे घाबरलेले नागरिक घराबाहेर रस्त्यावर धावून आले होते.

https://www.prahaar.in/2026/10/10/trump-putin-russia-diesel-deal-us-fuel-prices-lower/

हानीबाबतची सद्यस्थिती

पनामा कालवा प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, जलमार्गाचे कामकाज पूर्णपणे सामान्यपणे सुरू आहे. वेरागुआस, हेरेरा आणि लॉस सँटोस या मध्यवर्ती प्रांतांमध्ये काही किरकोळ नुकसानीच्या नोंदी असल्या तरी, राजधानीत कोणत्याही मोठ्या नुकसानीची नोंद झालेली नाही. प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here