Home ब्रेकिंग न्यूज Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांविरोधात भूमिका घेणाऱ्या सदस्यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांविरोधात भूमिका घेणाऱ्या सदस्यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

0
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांविरोधात भूमिका घेणाऱ्या सदस्यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
सुनेत्रा पवारांविरोधात भूमिका घेणाऱ्या सदस्यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी (Photo X )

मुंबई : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटापासून वेगळी भूमिका घेत स्वतंत्र पॅनेल उभारणारे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यासह त्यांच्या पॅनेलमधील सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बंडखोरांना नाव न घेता इशारा दिल्यानंतर ही कारवाई जाहीर करण्यात आली. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीतील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे.

https://www.prahaar.in/2026/10/08/nana-had-sent-a-final-message-to-a-friend-in-the-message-he-said/

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तीन पॅनेल आमनेसामने आले आहेत. अजित पवार गटाचे ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’, ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल’ आणि ‘सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’ यांच्यात लढत होत आहे. विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप हे अजित पवार यांचे विश्वासू मानले जात होते. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांनी स्वतंत्र पॅनेल उभे केले. या पॅनेलला भाजपचा पाठिंबा असल्याचे समजते.

जगताप यांच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी दोन दिवसांपूर्वी नाव न घेता बंडखोरांना इशारा दिला होता. ‘कुठल्याही चुकीच्या अफवेला बळी पडू नका. एकदा बाहेर ते कायमचे बाहेर, एवढे लक्षात ठेवा. दादा खूप मोठ्या मनाचे होते; दादांसारखी मी नाही,’ असे त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर आता पक्षाने हकालपट्टीची कारवाई जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, संभाजी होळकर आणि बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पत्रकार परिषद झाली. या वेळी तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी पक्षाच्या भूमिकेपासून दूर जात स्वतंत्र पॅनेल उभारल्याच्या कारणावरून पुरुषोत्तम जगताप यांच्यासह त्यांच्या पॅनेलमधील सदस्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले.

निवडणुकीतील चुरस वाढली

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत तीन पॅनेल उतरल्याने आधीच चुरस निर्माण झाली आहे. त्यात विद्यमान अध्यक्ष जगताप यांनी स्वतंत्र पॅनेल उभारल्याने अजित पवार गटासमोर आव्हान उभे राहिले आहे. आता पक्षाने केलेल्या कारवाईचा निवडणुकीतील समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here