Home ब्रेकिंग न्यूज Gas Leakage : IIT पवईच्या वसतिगृहात गॅस गळती; 2 मुलांसह 5 जण जखमी

Gas Leakage : IIT पवईच्या वसतिगृहात गॅस गळती; 2 मुलांसह 5 जण जखमी

0
Gas Leakage : IIT पवईच्या वसतिगृहात गॅस गळती; 2 मुलांसह 5 जण जखमी
IIT पवईच्या वसतिगृहात गॅस गळती; 2 मुलांसह 5 जण जखमी (AI Image)

मुंबई : पवई येथील आयआयटी परिसरातील वसतिगृह क्रमांक 6 मध्ये गॅस सिलिंडरच्या पाइपमधून गळती झाल्याने भडका उडाल्याची घटना गुरुवारी (8 ऑक्टोबर) रात्री घडली. या घटनेत 2 अल्पवयीन मुलांसह 5 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 10.24 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती संबंधित यंत्रणांना देण्यात आली. सिलिंडरच्या पाइपमधून गॅस गळती झाल्यानंतर अचानक भडका उडाला. या घटनेत पाच जण जखमी झाले. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

https://www.prahaar.in/2026/10/08/mumbai-metro-3-aqua-line-completes-one-year-mmrc-launches-special-initiatives-for-passengers/

राजावाडी रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमींपैकी चार जणांना पुढील उपचारांसाठी कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले, तर एका जखमीवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

जखमींमध्ये अंश अहिरवार (12), तहजीब आलम (9), ईश्वर सिंह (37), शिवकुमार सिंह (34) आणि अनिलकुमार यादव (23) यांचा समावेश आहे. यापैकी अंश, तहजीब, शिवकुमार आणि अनिलकुमार यांना कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ईश्वर सिंह यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि मुंबई महापालिकेच्या संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गॅस गळती नेमकी कशामुळे झाली, याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here