Home एक्सक्ल्युजिव्ह Nana Patekar Passes Away : नाना पाटेकरांचा कारगिल युद्धातील ‘तो’ थरारक किस्सा! पडद्यावरच नाही, तर सीमेवरही नडलेला ‘नटसम्राट’

Nana Patekar Passes Away : नाना पाटेकरांचा कारगिल युद्धातील ‘तो’ थरारक किस्सा! पडद्यावरच नाही, तर सीमेवरही नडलेला ‘नटसम्राट’

0
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकरांचा कारगिल युद्धातील ‘तो’ थरारक किस्सा! पडद्यावरच नाही, तर सीमेवरही नडलेला ‘नटसम्राट’
Nana Patekar passes away (2)

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे केवळ त्यांच्या अभिनयासाठीच नव्हे, तर त्यांच्या प्रखर राष्ट्रप्रेमासाठीही ओळखले जातात. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या नाना पाटेकर यांनी आपल्या करिअरच्या शिखरावर असताना देशसेवेसाठी काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला होता. १९९९ च्या कारगिल युद्धात त्यांनी प्रत्यक्ष सीमेवर जाऊन भारतीय सैनिकांसोबत सहभाग नोंदवला होता.

कारगिल युद्धाच्या वेळी थेट संरक्षकमंत्र्यांशी संपर्क

१९९९ मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये कारगिल युद्ध पेटले होते, तेव्हा नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाच्या यशस्वी कारकिर्दीला बाजूला ठेवत सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला. ९० च्या दशकात ‘प्रहार’ चित्रपटाच्या पटकथा लेखनादरम्यान त्यांनी ‘मराठा लाईट इन्फंट्री’सोबत सलग तीन वर्षे लष्करी प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळे युद्ध सुरू झाल्यावर त्यांनी सैन्य अधिकाऱ्यांकडे सीमेवर जाण्याची परवानगी मागितली. परंतु, सुरुवातीला अधिकाऱ्यांनी ही विनंती नाकारली आणि केवळ संरक्षणमंत्रीच याबाबत निर्णय घेऊ शकतात असे सांगितले. यानंतर नाना पाटेकर यांनी थेट तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधून सीमेवर जाण्याची परवानगी मिळवली.

१५ दिवसांत १५ ते २० किलो वजन घटले

ऑगस्ट १९९९ मध्ये नाना पाटेकर यांनी नियंत्रण रेषेच्या (LoC) अत्यंत जवळ सुमारे १५ दिवस घालवले. या काळात त्यांनी सैनिकांना मदत केली तसेच बेस हॉस्पिटलमध्ये जखमी जवानांची सेवाही केली. एका टॉक शो दरम्यान त्यांनी या अनुभवाचा उल्लेख करताना सांगितले होते की, “जेव्हा मी श्रीनगरला पोहोचलो तेव्हा माझे वजन ७६ किलो होते. पण सीमेवरील अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीमुळे परत येईपर्यंत माझे वजन घटून ५६ किलो झाले होते.”

अफवांमुळे चाहत्यांमध्ये चिंता

नाना पाटेकर यांच्या सामाजिक कामातील आणि सैन्यातील योगदानाचे आजही कौतुक केले जाते. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील शेतकरी आणि जवानांच्या कुटुंबांना मोठी मदत केली आहे. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर विविध अफवा पसरल्या होत्या, परंतु प्रत्यक्ष माहितीनुसार ते सुखरूप आहेत आणि त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाची आठवण आजही देशवासीयांच्या मनात ताजी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here