Home एक्सक्ल्युजिव्ह Nana Patekar Funeral Updates : नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्काराबाबत मोठी अपडेट ! कुठे आणि कधी होणार अंतिम विधी

Nana Patekar Funeral Updates : नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्काराबाबत मोठी अपडेट ! कुठे आणि कधी होणार अंतिम विधी

0
Nana Patekar Funeral Updates : नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्काराबाबत मोठी अपडेट ! कुठे आणि कधी होणार अंतिम विधी

Nana Patekar Funeral Updates : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी तसेच हिंदी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि प्रभावी संवादाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नाना पाटेकर यांनी वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील डोना पाउला येथील निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात नेण्यात आलं; मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आलं नाही.

नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार

नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्याजवळील डोणजे गावातील त्यांच्या निवासस्थानी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तशी माहिती दिली आहे. अभिनेते नाना पाटेकर यांचे मराठी नाटकासह मराठी, हिंदी सिनेमातील अतुलनीय योगदान पहाता त्यांचे अंत्यसंस्कार ‘शासकीय इतमामात’करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं घेतल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री अँड आशिष शेलार यांनी जाहीर केलंय.

मुलगा मल्हार पाटेकर गोव्यात दाखल

सध्या नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आलं असून, आवश्यक वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. नाना पाटेकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर गोव्यात पोहोचला आहे. त्याने रुग्णालयातील डॉक्टर तसेच कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर पार्थिव पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

पहाटे अचानक बिघडली प्रकृती

माहितीनुसार, नाना पाटेकर यांना गोव्यातील डोना पाउला येथील घरी पहाटे अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं. मणिपाल रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सुमारे 45 मिनिटे CPR देण्याचा प्रयत्न केला; मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने पहाटे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

https://www.prahaar.in/2026/10/08/it-wasnt-just-his-aggression-nana-also-brought-the-house-down-with-his-sharp-wit-read-nana-patekars-viral-comedy-dialogues/

रंगभूमीपासून बॉलिवूडपर्यंत गाजले ‘नाना’

नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. 1 जानेवारी 1951 रोजी जन्मलेल्या नाना पाटेकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. पुढे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली. गंभीर भूमिका असो, खलनायकाची भूमिका असो किंवा विनोदी व्यक्तिरेखा – नाना पाटेकर यांनी प्रत्येक भूमिकेला आपली खास छाप दिली. त्यांच्या दमदार आवाजामुळे, संवादफेकीमुळे आणि अभिनयातील नैसर्गिकतेमुळे त्यांचा स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण झाला. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘सलाम बॉम्बे!’ यांसारख्या हिंदी चित्रपटांसोबतच मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरही त्यांनी उल्लेखनीय काम केलं. ‘नटसम्राट’मधील त्यांची भूमिका विशेष गाजली. जवळपास पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी भारतीय सिनेसृष्टीला अनेक अविस्मरणीय व्यक्तिरेखा दिल्या.

https://www.prahaar.in/2026/10/08/film-fraternity-saddened-by-nanas-passing-bollywood-stalwarts-pay-tribute/

नाना पाटेकर यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत पोकळी

नाना पाटेकर यांच्या अचानक निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांसह कलाकार आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीने एक अष्टपैलू, प्रभावी आणि प्रतिभावान कलाकार गमावला आहे. जवळपास पाच दशकांचा त्यांचा अभिनयाचा प्रवास त्यांच्या असंख्य भूमिका आणि संवादांच्या माध्यमातून कायम स्मरणात राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here