Home फोटो गॅलरी आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी पंजाब किंग्स संघात गळती! दोन दिग्गजांनी सोडली साथ

आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी पंजाब किंग्स संघात गळती! दोन दिग्गजांनी सोडली साथ

0
आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी पंजाब किंग्स संघात गळती! दोन दिग्गजांनी सोडली साथ

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सर्व संघांची मोर्चेबांधणी सुरू आहे. असं असताना पंजाब किंग्सच्या गोटातून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कोचिंग स्टाफमधून दोन जणांना फ्रेंचायझीची साथ सोडली आहे. मिनी लिलाव जवळ असताना पंजाब किंग्ससाठी हा धक्का आहे.

आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी पंजाब किंग्सच्या अडचणीत वाढ झाली आहे. पंजाब किंग्सच्या कोचिंग स्टाफमधून दोन जणांनी फ्रेंचायझीला सोडचिठ्ठी दिली. क्रिकबझच्या वृत्तानुसार, ब्रॅड हॅडिन आणि जेम्स होप्स यांनी साथ सोडली आहे. होप्स आणि हॅडिन या दोघांवरही पाँटिंगचा विश्वास होता.पहिल्यांदा दिल्ली कॅपिटल्समध्ये आणि नंतर दोन वर्षे पंजाब किंग्समध्ये संघसहकारी होते. (Photo: ANI)
ब्रॅड हॅडिन आणि जेम्स होप्स यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. हॅडिन पंजाब किंग्स संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते, तर होप्स वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक होते. मीडिया रिपोर्टनुसार, या दोघांनी अलीकडेच पंजाब किंग्स व्यवस्थापनाला आपल्या निर्णयाबद्दल कळवले आहे. (Photo: ANI)
होप्स आणि हॅडिन यांच्या राजीनाम्यामागील मुख्य कारण म्हणजे त्यांनी नवीन भूमिका स्वीकारली आहे. होप्स यांची क्वीन्सलँड अँड ब्रिस्बेन हीट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे, तर हॅडिन यांनी न्यू साउथ वेल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. (Photo: ANI)
पंजाब किंग्समध्ये रिकी पाँटिंग हे एकमेव मुख्य प्रशिक्षक आहेत आणि त्यांच्या साथीला नवीन सहाय्यक कर्मचारी शोधावे लागतील. भारतीय संघाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक असलेले साईराज बहुतुले यांनीही यावर्षी आयपीएलनंतर संघ सोडला. तसेच टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये रूजू झाले. बहुतुले यांनी पंजाब संघात सुनील जोशी यांची जागा घेतली होती. (Photo: ANI)
रिकी पाँटिंगच्या प्रशिक्षणाखाली पंजाब किंग्स संघात कमालीची सुधारणा झाली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघ 2025 मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता. आयपीएल 2026 मध्ये पंजाबने सलग सहा सामने जिंकून दमदार सुरुवात केली होती. पण त्यानंतर सात पैकी सहा सामने गमावले आणि प्लेऑफची संधी हुकली. आता आयपीएल 2027 पूर्वी पाँटिंगला नवा सघा बांधावा लागणार आहे. (Photo: ANI)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here