Home ब्रेकिंग न्यूज Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा हवामान बदलणार;’या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता

Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा हवामान बदलणार;’या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता

0
Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा हवामान बदलणार;’या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता

महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला आहे. दिवसा वाढलेली उष्णता आणि दमट हवेमुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असताना काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे. 7 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानात विभागनिहाय वेगवेगळे बदल पाहायला मिळणार आहेत.

कोकणातील काही भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र काही ठिकाणी हलक्या पावसासह मेघगर्जना होऊ शकते. सध्या पावसाचा जोर कमी असून पुढील काही दिवस वातावरणात चढ-उतार राहण्याचा अंदाज आहे. या भागात कमाल तापमान 36 अंश तर किमान तापमान 24 अंशांच्या आसपास राहू शकते.

https://www.prahaar.in/2026/10/07/leveraging-csr-partnerships-is-essential-to-deliver-nutrition-to-children-in-impoverished-neighborhoods/

उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी असून बहुतांश जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या भागासाठी सध्या कोणताही पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. कोल्हापूर आणि घाट परिसरात काही ठिकाणी हलक्या सरींसह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहू शकते. कमाल तापमान 32 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यात सध्या पावसाचा कोणताही अलर्ट नाही. बहुतांश भागात कोरडे आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो.

विदर्भात गडचिरोली जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. विदर्भातील इतर भागांत मात्र पावसाची शक्यता तुलनेने कमी आहे.

एकूणच, राज्यातील बहुतांश भागांत सध्या उष्ण आणि दमट हवामान राहणार असून काही जिल्ह्यांत पावसाच्या सरी पडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन बाहेर पडण्याचे नियोजन करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here