Home ब्रेकिंग न्यूज Devendra Fadanvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट; दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी केंद्राकडे अधिक मदतीची मागणी

Devendra Fadanvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट; दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी केंद्राकडे अधिक मदतीची मागणी

0
Devendra Fadanvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट; दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी केंद्राकडे अधिक मदतीची मागणी
Devendra Fadanvis (2)

८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान केंद्रीय पथक राज्यात पाहणी करणार

मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची सविस्तर माहिती देत राज्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) निकषानुसार अधिकाधिक मदत मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)  यांच्याकडे केली. फडणवीस यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे शाह यांची भेट घेऊन राज्यातील दुष्काळाची स्थिती आणि राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यासंदर्भातील निवेदनही राज्य सरकारच्या वतीने शाह यांच्याकडे सादर करण्यात आले. महाराष्ट्रातील २६५ पेक्षा अधिक तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून या भागांसाठी दुष्काळी उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून अधिकाधिक मदत मिळणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी शाह यांच्या निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, केंद्र सरकारचे पथक ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात येऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार असल्याची माहिती शाह यांनी दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या पाहणीनंतर केंद्राकडून मदतीबाबत पुढील कार्यवाही होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत देण्यात येईल, असे आश्वासन शाह यांनी या भेटीत दिल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. तसेच केंद्र सरकार भक्कमपणे महाराष्ट्राच्या पाठीशी उभे राहील, असेही शाह यांनी आश्वस्त केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या सहकार्याबद्दल त्यांनी शाह यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here