Home क्रीडा मी तर संघातच नाही…! वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेविरुद्ध प्रश्न विचारताच शुभमन गिल झाला व्यक्त

मी तर संघातच नाही…! वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेविरुद्ध प्रश्न विचारताच शुभमन गिल झाला व्यक्त

मी तर संघातच नाही…! वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेविरुद्ध प्रश्न विचारताच शुभमन गिल झाला व्यक्त
मी तर संघातच नाही...! वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेविरुद्ध प्रश्न विचारताच शुभमन गिल झाला व्यक्त (Photo: ANI)

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारताने 2-1 विजय मिळवला असून आता टी20 मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ टी20 मालिकेत उतरणार आहे. दुसरीकडे, वनडे मालिका संपल्याने आणि कसोटी मालिका अजून लांब असल्याने शुभमन गिल आराम करत आहे. कारण शुभमन गिल हा टी20 संघाचा भाग नाही. पण शुभमन गिल पाहिल्यानंतर अनेकांना तो टी20 संघाचा कर्णधार असल्याचा भास होतो. त्यामुळे त्याला या फॉर्मेटबद्दल प्रश्न विचारला जातो. असाच प्रश्न वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी शुभमन गिलला विचारला गेला. त्यावर त्याने आपल्या शैलीत उत्तर दिलं.टीम इंडियाचा वनडे आणि कसोटी कर्णधार शुभमन गिलने दिलेलं उत्तर आता व्हायरल होत आहे. शुभमन गिलला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेबाबत प्रश्न विचारला गेला होता.

काय म्हणला शुभमन गिल?

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या नेतृ्त्वात भारतीय संघाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि सुवर्णपदकावर नाव कोरलं. या कामगिरीसाठी शुभमन गिलने भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. माझ्याकडून सर्व संघाचं अभिनंदन, असं तो म्हणाला. त्याने शुभेच्छा दिल्यानंतर त्याच्या पुढ्यात दुसरा प्रश्न तो म्हणजे वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी काय प्लानिंग केली आहे? तेव्हा शुभमन गिल म्हणाला की, मी तर टी 20 संघाचा भागच नाही. शुभमन गिलने शेवटचा टी20 सामना मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात खेळला होता. म्हणजेच एक वर्षापासून टीम इंडियाच्या टी20 संघाचा भाग नाही. इतकंच काय टी20 वर्ल्डकप स्पर्धेतूनही त्याला डावलण्यात आलं होतं. शुभमन गिलने भारतासाठी 36 टी20 सामने खेळले असून त्यात त्याने 138.59 च्या स्ट्राईक रेटने 869 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

http://prahaar.in/2026/10/06/harmanpreet-kaurs-major-decision-steps-down-as-team-india-captain/

शुभमन गिल टी20 संघात नसण्याचं कारण की..

शुभमन गिल (Shubman Gill )टी20 संघाचा भाग नाही. कारण भारतीय संघात टी20 संघात बरेच पर्याय आहे.ओपनिंगसाठी अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशीसारखे दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळे शुभमन गिलसाठी टॉप ऑर्डरमध्ये खेळण्यासाठी जागा नाही. खरं तर शुभमन गिलचा स्ट्राईक रेट तितका चांगला नाही. त्या तुलनेत इतर फलंदाजांचा स्ट्राईक रेट त्याच्यापेक्षा चांगला असल्याने त्याला संघात जागा मिळाली नाही. शुभमन गिलकडे वनडे आणि कसोटी संघाची धुरा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here