Home ब्रेकिंग न्यूज Missing Link accident : मिसिंग लिंकवर अपघातांची मालिका; केळींचा टेम्पो पलटी, बस-ट्रक धडकेत 6 ते 7 जण जखमी

Missing Link accident : मिसिंग लिंकवर अपघातांची मालिका; केळींचा टेम्पो पलटी, बस-ट्रक धडकेत 6 ते 7 जण जखमी

0
Missing Link accident : मिसिंग लिंकवर अपघातांची मालिका; केळींचा टेम्पो पलटी, बस-ट्रक धडकेत 6 ते 7 जण जखमी

खोपोली : मिसिंग लिंकवर आज पहाटेपासून दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटना घडल्या आहेत. मध्यरात्री सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कनेक्टिंग लिंकवर केळी वाहतूक करणारा पिकअप टेम्पो पलटी झाला. या अपघातात टेम्पो चालक समीर शेख जखमी झाला असून त्याच्यावर खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. टेम्पो पलटी होताच त्यामध्ये असलेल्या केळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडल्या. त्यामुळे काही काळ रस्त्यावर केळींचा ढीग साचला होता. अपघातानंतर टेम्पो बाजूला करण्यासह रस्त्यावर पडलेला माल हटवण्याचे काम सुरू करण्यात आले.

 

https://www.prahaar.in/2026/10/06/nashik-crime-former-student-blackmails-female-professor-in-nashik-demands-%e2%82%b95-lakh-while-threatening-to-make-private-videos-viral/

कनेक्टिंग लिंकवर दुसरा अपघात

दरम्यान, याच कनेक्टिंग लिंकवर आज आणखी एक अपघात झाला. बस आणि ट्रकची धडक झाल्याची माहिती असून या दुर्घटनेत 6 ते 7 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

https://www.prahaar.in/2026/10/06/a-father-killed-his-daughter-and-asked-ai-how-to-destroy-the-evidence-what-answer-did-the-ai-give-that/

एकाच मार्गावर काही तासांच्या अंतराने दोन अपघात झाल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. कनेक्टिंग लिंकवर वाहनांची वर्दळ मोठी असते. त्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवण्यासह वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दोन्ही अपघातांमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून रस्त्यावर पडलेला माल आणि अपघातग्रस्त वाहने हटवण्याचे काम सुरू आहे. या घटनांमुळे कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी यंत्रणांना अतिरिक्त प्रयत्न करावे लागत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here