Home क्रीडा न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ जाहीर, 4 वर्षानंतर भुवनेश्वर कुमारचं कमबॅक

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ जाहीर, 4 वर्षानंतर भुवनेश्वर कुमारचं कमबॅक

0
न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ जाहीर, 4 वर्षानंतर भुवनेश्वर कुमारचं कमबॅक
न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ जाहीर फोटो सौजन्य: ANI News

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पुरुष निवड समितीने आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडिया आणि इंडिया ‘ए’ संघाची अधिकृत घोषणा केली आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने जाहीर केलेल्या टीम इंडियाच्या आंतरराष्ट्रीय संघात अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन झाले आहे. भुवनेश्वर कुमारने भारतीय संघासाठी आपला शेवटचा टी20 सामना 2022 मध्ये खेळला होता. तेव्हापासून भारतीय संघातून बाहेर होता. त्यामुळे त्याचं संघात पुनरागमन होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण आपल्या कामगिरीच्या जोरावर त्याने पुन्हा एकदा संघात स्थान मिळवलं आहे.  यंदाच्या वर्षात आरसीबीला आयपीएल चॅम्पियन बनवण्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्याची दखल बीसीसीआयला घ्यावी लागली. भुवनेश्वर कुमारचं संघात पुनरागमन झाल्यानंतर क्रीडाप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. भारतीय संघाचा 22 ऑक्टोबरपासून न्यूझीलंड दौरा आहे. या दौऱ्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. त्यासाठी हा संघ जाहीर करण्यात आला आहे.

बीसीसीआयने निवडला मजबूत संघ

बीसीसीआयने निवडलेल्या संघात एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद या खेळाडूंमध्ये आहे. या संघात युवा आणि आक्रमक फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. भारताचा स्टार युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव यांना न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघात निवडलं आहे. तर दुसरीकडे, संजू सॅमसन यष्टिरक्षक म्हणून संघाचा भाग असणार आहे. इतकंच काय तर इशान किशनचीही संघात निवड झाली आहे. त्यांच्यासोबत अभिषेक शर्मा आणि नमन धीर सारखे आक्रमक फलंदाज आहेत. तिलक वर्माही मधल्या फळीची जबाबदारी पेलण्यासाठी सज्ज आहे. इतकंच काय तर अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी हे अष्टपैलू खेळाडूंची साथ मिळणार आहे. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती फिरकीची धुरा सांभाळतील. तर न्यूझीलंडच्या वेगवान खेळपट्ट्यांवर प्रिन्स यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंग आणि भुवनेश्वर कुमार वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील.

https://www.prahaar.in/2026/10/06/india-vs-west-indies-1st-t20-match-updates-from-the-lucknow-match-team-india-has-won-by-172-runs/

भारताचा टी20 संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), वैभव सूर्यवंशी, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा (उपकर्णधार), अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव.

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

  • पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना: 22 ऑक्टोबर, 2026 – हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च
  • दुसरी टी20: 24 ऑक्टोबर, 2026- हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च
  • तिसरा टी20 सामना: 27 ऑक्टोबर, 2026 — स्काय स्टेडियम, वेलिंग्टन
  • चौथी टी20: 30 ऑक्टोबर, 2026 – ईडन पार्क, ऑकलंड
  • पाचवा टी20 सामना: 1 नोव्हेंबर, 2026 – सेडन पार्क, हॅमिल्टन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here