Home ब्रेकिंग न्यूज Mission 2027: मुंबईत मेट्रोच्या कामांना गती मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये!

Mission 2027: मुंबईत मेट्रोच्या कामांना गती मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये!

0
Mission 2027: मुंबईत मेट्रोच्या कामांना गती मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये!
Mission 2027: मुंबईत मेट्रोचे जाळे पसरणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! (Photo: CMO Twitter)

मुंबईकरांना ट्रॅफिकच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी आणि दळणवळणाला बुलेट गती देण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. 2027 हे वर्ष मुंबईसाठी ‘मेट्रो वर्ष’ म्हणून ओळखले जावे, या उद्दिष्टाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या ‘मुख्यमंत्री वॉर रूम’च्या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी मुंबईसह राज्यातील प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांचा मॅरेथॉन आढावा घेतला. या बैठकीला नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

‘मिशन 2027’ आणि मेट्रोचे नवे लक्ष्य

  • पुढील वर्षात 70 किमीचे जाळे: 2027 मध्ये मुंबईत किमान 70 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका पूर्ण करून त्या जनतेच्या सेवेत दाखल करण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
  • कामांचा स्पीड वाढणार: डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणाऱ्या 36 किलोमीटरच्या मार्गिकांची व्याप्ती थेट 50 किलोमीटरपर्यंत नेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
  • यांत्रिकीकरणावर भर: मजुरांच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी प्रकल्पांचे 50 टक्के काम हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मशीनरीच्या माध्यमातून करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वाहतूक कोंडीतून सुटका आणि उन्नत मार्गिका

  • शिवडी-वरळी कनेक्टर: शिवडी ते वरळी या उन्नत मार्गिकेचे काम 31 मे 2027 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाईल.
  • विशेष ट्रॅफिक ब्लॉक: मेट्रो 2-ब मधील जुहू सर्कलजवळील गर्डर टाकण्यासाठी रविवारी 12 तासांचा विशेष ब्लॉक घेण्याचे नियोजन आहे, ज्यामुळे नागरिकांना कमीत कमी त्रास होईल.
  • कोंडीवर डिजिटल तोडगा: वाकोला जंक्शन आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (WEH) वाहतूक कोंडीची मुख्य ठिकाणे शोधून त्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने तातडीने उपाय शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • अद्ययावत ‘मॅपिंग’: पालिका आणि MMRDA ने भूमिगत सुविधांचे मॅपिंग करावे, जेणेकरून खोदकामामुळे प्रकल्पांना उशीर होणार नाही.

https://www.prahaar.in/2026/10/05/committee-to-probe-current-and-former-mpsc-chairpersons-and-members-recommendation-for-action-under-article-317/

छत्रपती संभाजीनगरसाठी मोठी घोषणा

  • प्रत्येक घराला नळजोडणी: छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेचे काम करताना शहरातील प्रत्येक घराला नळजोडणी मिळायलाच हवी, अशी कडक ताकीद मुख्यमंत्र्यांनी दिली.
  • कंत्राटदारांना कडक इशारा: कामात दिरंगाई करणाऱ्या किंवा मुदत उलटूनही काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना थेट ‘काळ्या यादीत’ टाकण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

बैठकीत ‘या’ सहा मोठ्या प्रकल्पांचा घेण्यात आला आढावा:

  • शिवडी ते वरळी उन्नत रस्ता जोडणी
  • मेट्रो मार्गिका 9: दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदर
  • मेट्रो मार्गिका 5: ठाणे ते धामणकर नाका आणि कशेळी डेपो
  • मेट्रो मार्गिका 2-बी: डी. एन. नगर ते डायमंड गार्डन – मंडाले
  • मेट्रो मार्गिका 6: स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी (जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेगवान करणार)
  • छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजना

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here