Home क्रीडा वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी भारताचा अर्धा संघ निश्चित! आकाश चोप्राने 6 नाव केली जाहीर

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी भारताचा अर्धा संघ निश्चित! आकाश चोप्राने 6 नाव केली जाहीर

0
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी भारताचा अर्धा संघ निश्चित! आकाश चोप्राने 6 नाव केली जाहीर
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी भारताचा अर्धा संघ निश्चित! आकाश चोप्राने 6 नाव केली जाहीर (Photo: ANI)

आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. आयसीसीने या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं असून दोन गटातील संघांबाबतही सांगितलं आहे. या स्पर्धेतील एकूण 10 संघ निश्चित झाले आहेत. तर उर्वरित दोन संघ पात्रता फेरीतून ठरवले जाणार आहेत. वनडे वर्ल्डकप 2026 स्पर्धा 2 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी आता एक वर्षाहून कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे प्रत्येक संघ या स्पर्धेच्या दृष्टीने संघाची बांधणी करत आहे. भारतीय संघ मोर्चेबांधणीत आघाडीवर आहे. या संघात कोण खेळणार आणि कोण नाही? याची चाचपणी केली जात आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने वनडे वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी सहा खेळाडूंची नावं निश्चित केली आहेत. या संघातून विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. इशान किशनचा फॉर्म पाहता या संघात स्थान दिलं आहे.

आकाश चोप्राने निवडलेले सहा खेळाडू कोण?

आकाश चोप्राने वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघावर बोट दाखवण्याची संधीही नाही. कारण निवडलेल्या सहा खेळाडूंचा अनुभव आणि फॉर्म जबरदस्त आहे. निवडलेल्या सहा खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली यांचं नाव टॉपला आहे. आकाश चोप्राने युट्यूब चॅनेवर स्पष्ट केलं की, ‘मी जेव्हा फलंदाजीचा क्रम पाहतोतेव्हा 2023 आणि 2027 फार अंतर नाही. रोहित शर्मा आणि शुभमन गिल ओपनिंग करतील. हे दोघं 2023 वर्ल्डकप संघात होते. त्यांचा फॉर्म जबरदस्त आहे आणि वर्ल्डकपपर्यंत त्यांचा फॉर्म चांगला असेल, अशी आशा करूयात. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर असेल.त्याचा फॉर्म पुढच्या वर्षापर्यंत मुद्दा असेल, असं मला वाटत नाही.’

https://www.prahaar.in/2026/10/05/icc-fines-both-india-and-west-indies-for-slow-over-rate-in-ind-vs-wi-3rd-odi/

चौथ्या आणि पाचव्या खेळाडूसाठी या खेळाडूंवर विश्वास

आकाश चोप्राने चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यरचं नाव घेतलं आहे. श्रेयस अय्यर मधल्या फळीची बाजू भक्कमध्ये सांभाळेल असा खेळाडू आहे. श्रेयस अय्यरने या क्रमांकावर 47हून अधिकच्या सरासरीने 2000 धावा केल्या आहेत. पाचव्या क्रमांकावर विकेटकीपर फलंदाज म्हणून केएल राहुलचं नाव घेतलं आहे. कारण विकेटकीपर फलंदाज म्हणून त्याला पसंती असेल. त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 68.58 च्या सरासरीनेधावा केल्या आहे. तसेच 4 शतकं आणि 10 अर्धशतकं ठोकली आहेत.

सहाव्या स्थानासाठी खेळाडूचं नाव घेतलं, पण..

आकाश चोप्राने सहावा खेळाडू म्हणून अष्टपैलू हार्दिक पांड्याचं नाव घेतलं आहे. सध्या हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असून रिकव्हर होण्यासाठी प्रयत्न करत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेतही त्याचं खेळणं कठीण आहे. पण वनेड वर्ल्डकप स्पर्धेसाठी सहाव्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या योग्य पर्याय असल्याचं मत आकाश चोप्राने व्यक्त केलं आहे. पण हार्दिक पांड्याचा फॉर्म कसा आहे? याबाबत अंदाज नसल्याचं आकाश चोप्राने स्पष्ट केलं.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here