Home ब्रेकिंग न्यूज BMC : मुंबईतील रस्ते पुन्हा टँकरच्या पाण्याने धुणार

BMC : मुंबईतील रस्ते पुन्हा टँकरच्या पाण्याने धुणार

0
BMC : मुंबईतील रस्ते पुन्हा टँकरच्या पाण्याने धुणार

मुंबईतील सातही परिमंडळांमध्ये टँकर सेवांसाठी कंत्राटदारांची नियुक्ती

तब्बल १५०दिवसांसाठी आठ कोटींचा केला जाणार खर्च

मुंबई (सचिन धानजी) : पावसाळा संपल्यांनतर आता हिवाळा सुर झाल्यानंतर पुन्हा एकदा हवेतील धुळ व वायू प्रदुषणाची समस्या डोकेवर काढणार आहे. हवेतील हे धुळीचे व वायूचे प्रदुषण रोखण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्तांनी आढावा बैठक घेवून योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असून या दृष्टीकोनातून आता महापालिका प्रशासन अलर्ट झाले आहे. यासाठी मुंबईतील रस्ते धुण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. यासाठी जेटिंग व्यवस्थेसह पाण्याचे टँकरची सेवा पुढील १५० दिवस घेतली जाणार आहे. यासाठी सातही परिमंडळांमध्ये रस्ते धुण्यासाठी टँकरची सेवा घेण्यासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे.

मुंबईतील वायू व धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिकेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रदूषणाची पातळी नियंत्रित ठेवणे तसेच मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणे यामध्ये समतोल साधण्याच्या उद्देशाने, मुंबईतील वाढते वायू व धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच त्यावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीचा कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबई शहरात बांधकाम व पायाभूत सुविधा प्रकल्पांची संख्या सातत्याने वाढत असून, त्यांपैकी बहुतांश प्रकल्प है पुनर्विकासाशी संबंधित आहेत. याशिवाय, वाहनांमधून होणारे उत्सर्जन, औद्योगिक उत्सर्जन तसेच पारंपरिक इंधनांचा वापर यांसारख्या विविध स्रोतांमुळे वायू प्रदूषणात वाढ होत असून, त्यातून पर्यावरणीय आव्हाने निर्माण होत आहेत. धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांपैकी सार्वजनिक रस्त्यांची उच्च दाबाच्या पाण्याद्वारे नियमित स्वच्छता याला प्राधान्य दिले जाते.

या उपाययोजनेमुळे शहर व उपनगरांतील एकूण स्वच्छतेच्या स्तरात वाढ होण्यास मदत होत आहे. या अनुषंगाने, स्वच्छता मोहिमेअंतर्गत पाण्याचे टँकर तैनात करून सार्वजनिक रस्त्यांवरील धूळ प्रभावीपणे नियंत्रित व व्यवस्थापित करण्यात येणार आहे. यामुळे वायू व धूळ प्रदूषण कमी होण्यास तसेच शहरातील पर्यावरणीय गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.

मुंबईतील एकूण सुमारे ६७७ कि.मी. लांबीचे ३७७ सार्वजनिक रस्ते या स्वच्छतेसाठी निश्चित केले आहेत. या रस्त्यांची दररोज पाण्याद्वारे स्वच्छता केली जाणार असून, त्यासाठी २०००, ५,००० लिटर व १०,००० लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टँकरचा वापर करण्यात येणार आहे. सेवा पुरवठादारांच्या देखरेखीसाठी, नियंत्रणासाठी आणि सुलभतेसाठी २६ प्रभागांमध्ये तैनात करण्यात येणा-या टँकरचे सात परिमंडळांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. मुंबईतील रस्ते धुण्यासाठी जेटिंग व्यवस्थेसह पाण्याचे टँकर १५० दिवसांसाठी (पावसाळा वगळून) भाडेतत्त्वावर सात परिमंडळांसाठी सेवा घेतली जाणार आहे.

भाडेतत्वावरील २०००, ५००० व १०००० लिटर क्षमतेचा पाण्याचा टँकरची वाहन सेवांसाठी नियुक्त कंत्राटदार

परिमंडळ – १ : में इन्फ्रा ट्रान्नाप्रोजेक्ट (८४.५१लाख रुपये)

परिमंडळ २ : मे. के. सास असोसिएट्स (७२.२५ लाख रुपये)

परिमंडळ ३ : मे. श्री माऊली एंटरप्रायझेस (९२.८८ लाख रुपये)

परिमंडळ – ४ : मे. अंशुमान अँड कंपनी(२.२१ कोटी रुपये)

परिमंडळ ५ : मे. दीपक अँड सन्स ट्रान्सकॉन एलएलपी(१.०९ कोटी रुपये)

परिमंडळ ६ : मे. अंशुमान अँड कंपनी(१.०३ कोटी रुपये)

परिमंडळ ७ : मे. आरती कॉर्पोरेशन (१.०८ रुपये)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here