Home ब्रेकिंग न्यूज क्रीडा संकुलाच्या लोकार्पणावरून वसई-विरारमध्ये राजकीय राडा; बविआच्या कार्यक्रमाला भाजपचा विरोध

क्रीडा संकुलाच्या लोकार्पणावरून वसई-विरारमध्ये राजकीय राडा; बविआच्या कार्यक्रमाला भाजपचा विरोध

0
क्रीडा संकुलाच्या लोकार्पणावरून वसई-विरारमध्ये राजकीय राडा; बविआच्या कार्यक्रमाला भाजपचा विरोध
बविआच्या कार्यक्रमाला भाजपचा विरोध(Photo:Prahaar)

विरार : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या क्रीडा संकुलाच्या लोकार्पण सोहळ्यावरून शनिवारी शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. माजी आमदार तथा बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सुपुत्र व माजी आमदार क्षितीज ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा संकुलाचे लोकार्पण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला भाजपने विरोध दर्शविल्याने सकाळपासूनच क्रीडा संकुल परिसरात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

महापालिकेचे महापौर अजीव पाटील आणि उपमहापौर मार्शल लोपीस यांच्या पुढाकाराने शनिवारी क्रीडा संकुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी क्षितीज ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. दरम्यान, या कार्यक्रमाला भाजपचे खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार स्नेहा दुबे पंडित, आमदार राजन नाईक यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला. क्रीडा संकुलाच्या लोकार्पणाचा अधिकार आणि कार्यक्रमाच्या आयोजनावरून भाजपने आक्षेप घेत सकाळीच स्वतंत्रपणे क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतल्याने वादाला तोंड फुटले.

https://www.prahaar.in/2026/10/03/a-pilot-project-to-desilt-seven-dams-in-the-state-will-be-undertaken/

उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून दोन्ही राजकीय पक्षांकडून शक्तिप्रदर्शन सुरू झाल्याने क्रीडा संकुल परिसरात मोठी गर्दी झाली. यावेळी दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. काही काळ कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची आणि धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी क्रीडा संकुल परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. गेल्या सुमारे तासाभरापासून परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून, लोकार्पण सोहळ्यावरून सुरू झालेला राजकीय वाद अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. क्रीडा संकुलाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने वसई-विरारमधील बविआ आणि भाजपमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here