मुंबई: मिठी नदी गाळ उपशात झालेल्या ६५ कोटींच्या घोटाळ्यात अभिनेता डिनो मोरिया याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून, या प्रकरणी उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांची चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी शनिवारी केली. आदित्य ठाकरे आणि डिनो मोरिया यांचे व्यावसायिक संबंध असल्याने, कोविड काळात मुंबई महापालिकेतून दिलेल्या कंत्राटांची श्वेत पत्रिका काढावी अशी मागणी त्यांनी केली.
https://www.prahaar.in/2026/10/03/20-new-ac-local-will-be-added-to-mumbai-suburban-railway-central-railway-and-western-railway-fleet-in-new-year-2027/
बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत म्हात्रे म्हणाल्या, की डिनो मोरियाची अटक हे मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यातील हिमनगाचे टोक आहे. या घोटाळ्यात डिनोचा खास मित्र आदित्य ठाकरे याचा थेट संबंध आहे. उबाठाची सत्ता असताना डिनो मोरिया पालिकेत वारंवार यायचा. मोरिया आणि कंत्राटदार केतन कदम पार्टनर असल्याचे संभाषणातून सिद्ध झाले आहे. डिनो आणि आदित्य ठाकरे यांची प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये कमिशन घेणारी वसुली गँग आहे, असा खळबळजनक आरोप म्हात्रे यांनी केला. कोविडकाळातील खिचडी घोटाळा, बॉडी बॅग घोटाळा, कोविड सेंटर घोटाळा, ऑक्सिजन प्लॅन्ट अशा कॉन्ट्रॅक्टची सखोल चौकशी होऊन श्वेत पत्रिका काढावी, अशी मागणी म्हात्रे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांकडे केली.
https://www.prahaar.in/2026/10/03/case-registered-against-500-people-including-abhijit-dipke-for-staging-a-protest-without-permission/
त्या पुढे म्हणाल्या की दिशा सालियन हत्याप्रकरणात डिनो मोरिया याचे नाव आहे. मिठी नदी घोटाळा असो किंवा दिशा सालियन हत्याकांड असो डिनो मोरिया याचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे डिनो मोरिया याच्या मोबाईल मधील चॅट आणि कॉल डेटा जनतेसमोर यायला हवा. यातून अनेक गोष्टींचा उलगडा होईल. डिनो मोरियाची ज्या प्रकारे चौकशी सुरू आहे, त्याच प्रकारे आदित्य ठाकरेची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करावी, अशी मागणी म्हात्रे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली. यासंदर्भात शिवसेनेकडून मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र दिले जाईल, असे म्हात्रे म्हणाल्या.