Home देश Flydubai Plane Attack : फ्लायदुबई विमान हल्ला : “ती बातमी ऐकून मी हादरून गेले होते…” – कॅप्टन स्मित मच्छार यांच्या पत्नीची भावूक प्रतिक्रिया

Flydubai Plane Attack : फ्लायदुबई विमान हल्ला : “ती बातमी ऐकून मी हादरून गेले होते…” – कॅप्टन स्मित मच्छार यांच्या पत्नीची भावूक प्रतिक्रिया

0
Flydubai Plane Attack : फ्लायदुबई विमान हल्ला : “ती बातमी ऐकून मी हादरून गेले होते…” – कॅप्टन स्मित मच्छार यांच्या पत्नीची भावूक प्रतिक्रिया
Flydubai Plane Attack

नवी दिल्ली : फ्लायदुबईच्या विमानात कॉकपिटमध्येच झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून वाचलेले भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार (captain Smit Machhar) यांच्या पत्नी सोनल मच्छार (Sonal Machhar) यांनी त्या भयानक क्षणांची आठवण सांगताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पतीसोबत घडलेला हा प्रकार ऐकून आपल्याला प्रचंड धक्का बसला होता आणि या संकटावर कशी प्रतिक्रिया द्यावी, हेच सुचत नव्हते, असे त्यांनी सांगितले.

धक्क्यातून सावरताना मिळाला कुटुंबियांचा आधार

CNN-News18 शी बोलताना सोनल मच्छार म्हणाल्या, “पतीवरील हल्ल्याची माहिती मिळाल्यावर मी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. त्या क्षणी मला काय करावे हेच सुचत नव्हते.” परंतु, कठीण काळात कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवार सोबत असल्याने मोठा मानसिक आधार मिळाला. तसेच, भारतीय अधिकाऱ्यांकडून सातत्याने मिळणाऱ्या अपडेट्समुळे पती सुरक्षित आणि स्थिर असल्याची खात्री पटली, असे सोनल यांनी नमूद केले.

अबू धाबीच्या रुग्णालयात झाली भेट

https://www.prahaar.in/2026/10/02/nashik-cleanliness-drive-in-the-kannamwar-bridge-area-on-the-occasion-of-gandhi-jayanti-minister-girish-mahajan-and-mayor-himgauri-adke-participate/

गुरुवारी सोनल यांनी संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अबू धाबी येथील रुग्णालयात जाऊन पती स्मित यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्या मनातील भीती दूर झाली. रुग्णालयातील उपचारांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “त्यांची भेट घेतल्यानंतर मला खूप मोठा दिलासा मिळाला आहे. ते युएईच्या आणि लष्कराच्या अत्यंत कुशल डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.” आता स्मित यांना लवकरात लवकर घरी आणणे आणि त्यांच्या उपचारांकडे पूर्ण लक्ष देणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

नेतान्याहू यांच्या संभाषणावर स्पष्ट भूमिका

https://www.prahaar.in/2026/10/02/navratri-festival-ashtami-and-navami-fall-on-the-same-day-during-navratri-this-year-check-out-the-important-dates-from-ghatasthapana-to-dussehra/

इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू कॅप्टन स्मित यांच्याशी संवाद साधू इच्छितात का, असा प्रश्न विचारला असता सोनल म्हणाल्या, “मी स्वतः नेतान्याहू यांच्याशी बोलू शकत नाही. या विषयावर स्मित हेच योग्य व्यक्ती आहेत. ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर आणि योग्य मनस्थितीत आल्यावर नक्कीच नेतान्याहू यांच्याशी संवाद साधतील.”

पंतप्रधान मोदींशी संवाद : कॅप्टन स्मित यांनी सांगितला थरार

शुक्रवारी कॅप्टन स्मित मच्छार यांनी रुग्णालयातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर संवाद साधला. कॉकपिटमधील त्या भीषण प्रसंगाचे वर्णन करताना कॅप्टन स्मित म्हणाले, “हल्ल्यानंतर मी जमिनीवर कोसळलो होतो. पण माझ्या १७ वर्षांच्या उड्डाणाचा अनुभवामुळे विमान वेगाने खाली जात असल्याचे माझ्या लगेच लक्षात आले. माझ्यावर सलग वार होत असतानाही मी स्वतःला बजावले—’स्मित, हीच तुझी शेवटची संधी आहे, दार तिथेच आहे.’ मी ताकदीने कॉकपिटचे दार उघडले आणि त्यानंतर इतर कर्मचारी व प्रवासी मदतीला धावून आले.” स्वतःचा जीव वाचवत असताना १८० प्रवाशांचा जीव वाचवणे हेच माझे मुख्य कर्तव्य होते, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी कॅप्टन स्मित यांच्या धैर्याचे आणि समयसूचकतेचे कौतुक करत संपूर्ण देशाला त्यांचा सार्थ अभिमान असल्याचे सांगितले.

कसा घडला होता तो धक्कादायक प्रसंग ?

३० सप्टेंबर रोजी दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या फ्लाईदुबईच्या विमानात ही थरारक घटना घडली होती. ओमान वंशाच्या सह-वैमानिकाने (को-पायलट) दहशतवादी विचाराने प्रेरित होऊन मुख्य कॅप्टन स्मित यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. अवघ्या दोन मिनिटांत विमान १६,००० फूट खाली आले होते. गंभीर जखमी असूनही कॅप्टन स्मित यांनी हल्लेखोराचा प्रतिकार केला आणि कॉकपिटचे दार उघडले. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी आणि प्रवाशांनी आत घुसून हल्लेखोराला पकडले. त्यानंतर विमानात असलेल्या दोन ऑफ-ड्यूटी वैमानिकांनी ताबा मिळवत सौदी अरेबियातील तबूक येथे विमानाचे सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग केले, ज्यामुळे सर्व १८० प्रवासी सुरक्षित राहिले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर तपास सुरू

हल्ल्यानंतर पकडण्यात आलेल्या सह-वैमानिकाला युएई प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. इस्त्रायली तपास यंत्रणांचे पथकही युएईमध्ये दाखल झाले असून, या हल्ल्यामागे कोणत्याही आंतरराष्ट्रीय किंवा बाह्य दहशतवादी संघटनेचा हात आहे का, याचा शोध स्थानिक पोलिसांच्या मदतीने घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here