Home ब्रेकिंग न्यूज Diveagar Accident : दिवेआगर दुर्घटनेची सखोल चौकशी होणार; दोषींवर कडक कारवाईचे निर्देश

Diveagar Accident : दिवेआगर दुर्घटनेची सखोल चौकशी होणार; दोषींवर कडक कारवाईचे निर्देश

0
Diveagar Accident :  दिवेआगर दुर्घटनेची सखोल चौकशी होणार; दोषींवर कडक कारवाईचे निर्देश

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे समुद्रात बुडून 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेनंतर प्रशासनाने मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांशी संवेदनशीलपणे संपर्क ठेवावा आणि आवश्यक मदत करावी, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आळंदी येथील अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या एका खासगी अकॅडमीचे विद्यार्थी सहलीसाठी दिवेआगर येथे गेले होते. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने काही विद्यार्थी खोल पाण्यात गेले. यामध्ये 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृत विद्यार्थ्यांचे वय 16 ते 17 वर्षे होते. (Diveagar Accident)

https://www.prahaar.in/2026/10/02/investment-of-%e2%82%b98-57-lakh-crore-in-maharashtra-2-91-lakh-job-opportunities/

या सहलीत एकूण 48 विद्यार्थी होते आणि त्यांच्या सोबत केवळ 2 शिक्षक होते. विद्यार्थ्यांना पोहता येते की नाही, याची माहिती घेणे आणि त्यांना धोकादायक ठिकाणी जाण्यापासून रोखणे ही आयोजकांची जबाबदारी असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.

समुद्रकिनारे, धरणे किंवा तलाव अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सहली आयोजित करताना त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. या प्रकरणात अकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून चौकशी करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

घटनेनंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून तपासाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

सहलींसाठी प्रस्तावित मार्गदर्शक सूचना

– खासगी क्लासेस, शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सहलीसाठी बाहेर नेताना त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारणे बंधनकारक करण्यावर भर.
– समुद्रकिनारे, धरणे आणि तलाव येथे सहली आयोजित करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी आयोजक संस्थेची असेल.
– विद्यार्थ्यांना पोहता येते का, याची माहिती घेणे आणि त्यांना खोल पाण्यात जाण्यापासून रोखणे आवश्यक.
– सहलीतील विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत पुरेशी देखरेख उपलब्ध असणे महत्त्वाचे. दिवेआगरच्या दुर्घटनेत ४८ विद्यार्थ्यांसोबत केवळ दोन शिक्षक होते.
– दुर्घटना घडल्यास संबंधित संस्थेची आणि पदाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here