Home साप्ताहिक अर्थविश्व RBI Repo Rate : कर्जदारांच्या खिशाला कात्री लागणार; आरबीआय रेपो रेट वाढवण्याच्या तयारीत, काय होणार परिणाम?

RBI Repo Rate : कर्जदारांच्या खिशाला कात्री लागणार; आरबीआय रेपो रेट वाढवण्याच्या तयारीत, काय होणार परिणाम?

0
RBI Repo Rate : कर्जदारांच्या खिशाला कात्री लागणार; आरबीआय रेपो रेट वाढवण्याच्या तयारीत, काय होणार परिणाम?
RBI Repo Rate

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) आगामी द्वैमासिक मौद्रिक धोरण समितीची (MPC) तीन दिवसीय आढावा बैठक 5 ते 7 ऑक्टोबर दरम्यान मुंबईत पार पडणार आहे. आर्थिक क्षेत्रातील जाणकारांच्या अंदाजानुसार, या बैठकीत महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी धोरणात्मक व्याजदर असलेल्या रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची वाढ केली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही सहा सदस्यीय बैठक संपन्न होईल. यामध्ये देशातील चालू आर्थिक घडामोडी, महागाईचा दर आणि व्याजदरांच्या स्थितीचा सखोल आढावा घेतला जाईल. त्यानंतर, 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता गव्हर्नर संजय मल्होत्रा मौद्रिक धोरणातील अंतिम निर्णयांची घोषणा करणार आहेत.

https://www.prahaar.in/2026/10/01/commercial-cylinder-prices-hiked-on-the-very-first-day-of-october-domestic-gas-rates-remain-unchanged/

ब्रोकरेज फर्म नोमुराचा अंदाज

जागतिक ब्रोकरेज फर्म ‘नोमुरा’ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ऑक्टोबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांत होणाऱ्या मौद्रिक आढावा बैठकांमध्ये रेपो रेटमध्ये प्रत्येकी 0.25 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी, ऑगस्ट महिन्यात झालेल्या मागील एमपीसी बैठकीत आरबीआयने रेपो रेट 5.25 टक्क्यांवर स्थिर ठेवला होता. मात्र, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय बँक व्याजदरांबाबत काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण देशाचे आणि उद्योग जगताचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here