Home ब्रेकिंग न्यूज Prithvik Pratap: कौतुकास्पद! पृथ्विक प्रतापचं काम ऐकून तुम्हीही कौतुक कराल, जिल्हा परिषद शाळेसाठी घेतलाय खास उपक्रम

Prithvik Pratap: कौतुकास्पद! पृथ्विक प्रतापचं काम ऐकून तुम्हीही कौतुक कराल, जिल्हा परिषद शाळेसाठी घेतलाय खास उपक्रम

0
Prithvik Pratap: कौतुकास्पद! पृथ्विक प्रतापचं काम ऐकून तुम्हीही कौतुक कराल, जिल्हा परिषद शाळेसाठी घेतलाय खास उपक्रम
फोटो सौजन्य: पृथ्विक प्रताप इन्स्टाग्राम

ठाणे: कायमच आपल्या दमदार अभिनयामुळे चाहत्यांमध्ये अभिनेता पृथ्विक प्रताप चर्चेत राहतो. महाराष्ट्राची हास्यजत्रा, टिव्ही सिरियल आणि अनेक मराठी चित्रपटांच्या माध्यमातून पृथ्विक चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. सध्या पृथ्विकचे एका कामामुळे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्विक प्रतापने ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यातील नदीचवाडी या गावातील, जिल्हा परिषदेच्या शाळेची पुन:र्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय अभिनेत्याने शाळेची पटसंख्य वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. फक्त शाळेची इमारत न बांधता खेड्यापाड्यातील मुलांनाही चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, हा त्यामागाचा हेतू आहे. आपण समाजाचं काही तरी देणं लागतो, या भावनेनं ग्रामीण परिसरातील शिक्षणामध्ये काही तरी बदल घडवण्याचा तो प्रयत्न करतोय.

https://www.prahaar.in/2026/10/02/ashok-saraf-and-sankarshan-karhade-starrer-aadi-anant-first-look-released-on-social-media-mahesh-limaye-directed-marathi-movie-release-date-declared/

परिजात संस्थेच्या माध्यमातून पृथ्विक शहापूर तालुक्यातील नदीचवाडी गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेची पुन:र्बांधणी करणार आहे. शिक्षण फक्त नावासाठी न घेता, त्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलं स्वत:ची रोजंदारी निर्माण करू शकतील. परिस्थिती बदलण्याची, स्वत:चे निर्णय घेण्याची आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सुद्धा शिक्षणातूनच बदलतो, म्हणून आज प्रत्येकासाठी शिक्षण किती महत्त्वाचं आहे. या उपक्रमातून अभिनेता प्रत्येकाला पटवून देण्याचे काम करत आहे. महाराष्ट्रामध्ये अशा किती शाळा आहेत, ज्या कमी पट संख्यांमुळे बंद कराव्या लागल्या आहेत. यामुळे अनेक ग्रामीण भागातील मुलांना याचा फटका बसला आहे. कमी पटसंख्येचा फटका ग्रामीण भागातील मुलांना बसू नये, यासाठी पृथ्विकने जिल्हा परिषद शाळेसाठी खास उपक्रम हाती घेतलाय.

https://www.prahaar.in/2026/10/02/drishyam-the-conclusion-receives-an-overwhelming-response-from-the-audience-ajay-devgns-film-creates-a-buzz-on-social-media/

कमी पटसंख्येमुळे शाळा न बंद करता ग्रामीण भागातील मुलांसाठी जिल्हा परिषदेची शाळा कशी उत्तम ठरेल, या दृष्टीने परिजात संस्था काम करतेय. नदीचवाडी गावातील जिल्हा परिषदेची शाळेची पुन:र्बांधणी करण्यात येणार आहे. शिवाय, आजु बाजुच्या परिसरात विकास कामेही करण्यात येणार आहे. नदीचवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये, वीटभट्टी कामगारांच्या मुलांना आणि मोलमजुरी करणाऱ्या कामगारांच्या मुलांना शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहन अधिक देण्यात आलं. त्यामुळे बंद होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या वाढण्यात मदत झाली. सध्याच्या घडीला गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या 24 वर आहे. पृथ्विकने आपल्या छोट्या मदतीने गरजु विद्यार्थ्याचं नशीब बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आपण केलेली छोटी मदत एखाद्या मुलाला लागणारी शैक्षणिक मदत भागू शकते, अशी प्रतिक्रिया अभिनेत्याने दिली.

https://www.prahaar.in/2026/10/02/actress-nushrratt-bharuccha-meets-with-an-accident-in-bali-requires-surgery-pr-team-shares-official-update/

या उपक्रमासाठी पृथ्विकला स्वप्नील पाथरे आणि परिजात संस्थेने मोलाची मदत केली. शाळा पुन:र्बांधणी करण्याच्या प्रक्रियेमध्ये, स्वप्नील पाथरे यांच्यासारखी माणसं आणि ‘पारिजात’सारख्या संस्था मदत करत नाहीत, तर योग्य दिशादर्शकाचं काम करतात. शाळा उभी करणं हा पहिला टप्पा आहे; त्या शाळेतून मुलांना पुढे जाण्याची संधी मिळणं, हा पृथ्विकचा उद्देश आहे, असं त्याने सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here