Home ब्रेकिंग न्यूज दिवेआगारातील त्या घटनेनंतर आळंदीतील विनर्स अकादमीला फटका, परवाना केला रद्द; कारण की….

दिवेआगारातील त्या घटनेनंतर आळंदीतील विनर्स अकादमीला फटका, परवाना केला रद्द; कारण की….

0
दिवेआगारातील त्या घटनेनंतर आळंदीतील विनर्स अकादमीला फटका, परवाना केला रद्द; कारण की….

११ वी आणि १२ वी इयत्तेत शिकत असलेल्या८ अल्पवयीन मुलांचा दिवेआगर येथे पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आळंदी येथील ‘विनर्स अकॅडमी’ या खासगी कोचिंग क्लासच्या वतीने रायगड किल्ला व दिवेआगर येथे सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीसाठी २५ मुलगे, १७ मुली आणि ६ शिक्षक असा एकूण ४८ जणांचा गट गुरुवारी पहाटे आळंदीहून रवाना झाला होता. दिवसभर विविध ठिकाणी फिरल्यानंतर सायंकाळच्या सुमारास सर्व विद्यार्थी दिवेआगर समुद्रकिनारी पोहोचले. समुद्रात मौजमजेसाठी उतरलेल्या काही विद्यार्थ्यांना पाण्याच्या खोलीचा व जोरदार प्रवाहाचा अंदाज आला नाही. अचानक आलेल्या मोठ्या लाटांमुळे आठ विद्यार्थी पाण्याच्या प्रवाहात खेचले गेले आणि बुडाले.या मृत्यूनंतर आता विनर्स अकादमीची चौकशी होत आहे. या चौकशी दरम्यान विनर्स अकादमीचा परवाना रद्द करण्यात आला आहे. परवाना रद्द करण्यामागे नेमकं कारण काय जाणून घेऊया.

या दुर्घटनेचे पडसाद उमटताच आळंदी नगरपरिषदेने शहरातील कोचिंग क्लासेस व आस्थापनांची तातडीने तपासणी सुरू केली. नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकॅडमी चालवल्या जाणाऱ्या इमारतीची (मालमत्ता क्र. जुना ११३७, नवीन LAN00001729) प्रत्यक्ष पाहणी केली. तपासणीदरम्यान या अकॅडमीने नगरपरिषदेकडून आवश्यक असणारा व्यवसाय परवाना अथवा ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) न घेतल्याचे निष्पन्न झाले. कोणत्याही कायदेशीर परवानग्यांशिवाय हे क्लास सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या आदेशानुसार कर विभाग प्रमुख सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पोलीस बंदोबस्तात विनर्स अकॅडमीची इमारत सील करण्याची धडक कारवाई केली. सर्व आस्थापनांनी कायदेशीर नियमांचे पालन करावे आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित व्हावी, यासाठी नगरपरिषदेकडून ही कडक कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या दुर्दैवी दुर्घटनेमुळे आळंदी आणि पुणे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

https://www.prahaar.in/2026/10/02/thorough-inquiry-into-diveagar-incident-instructions-issued-for-strict-action-against-the-guilty/

पालकांचा तीव्र संताप

आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत संस्थेने अक्षम्य निष्काळजीपणा दाखवल्याचा आरोप पालकांनी केला आहे. एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “सहल नेण्यापूर्वी जबाबदारीची संमतीपत्रे भरून घेताना संस्थेने जेवढी तत्परता दाखवली, तेवढी काळजी मुलांच्या सुरक्षेबाबत घेतली नाही.” एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना समुद्रावर नेताना आवश्यक ती सुरक्षा यंत्रणा व प्रशिक्षित जीवरक्षक सोबत असायला हवे होते, अशी तीव्र प्रतिक्रिया पालकांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here