मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी येत्या रविवार, दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सुरक्षा आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी हा ब्लॉक अत्यंत महत्त्वाचा असून यामुळे प्रवाशांच्या लोकल फेऱ्यांवर परिणाम होणार आहे.(Sunday Mega Block)
कुठे आणि किती वाजता असणार ब्लॉक?
1. मेन लाईन (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार):
-
वेळ: सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत (अप आणि डाऊन धीमा मार्ग).
-
परिणाम: सीएसएमटीवरून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल विद्याविहारपर्यंत जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे पुन्हा धीम्या मार्गावर जातील. तसेच घाटकोपरहून सकाळी 10.19 ते दुपारी 3.52 पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान जलद मार्गावर चालवल्या जातील.
2. हार्बर लाईन (पनवेल – वाशी):
-
वेळ: सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत (अप आणि डाऊन मार्ग, पोर्ट लाईन वगळून).
-
परिणाम: पनवेलहून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर सेवा आणि सीएसएमटीवरून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर सेवा पूर्णपणे रद्द राहतील.(Sunday Mega Block)
3. ट्रान्स-हार्बर लाईन:
-
वेळ: पनवेल ते ठाणे (अप) सकाळी 11.02 ते दुपारी 3.53; आणि ठाणे ते पनवेल (डाऊन) सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत सेवा रद्द राहतील.
https://www.prahaar.in/2026/10/02/western-railway-surat-udaipur-vande-bharat-express-bookings-open-learn-its-timetable-route-stoppages-and-fare-details-here/
प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था
ब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सीएसएमटी – वाशी दरम्यान विशेष उपनगरीय रेल्वे सेवा चालवल्या जातील. तसेच ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईनवरील सेवा आणि ‘पोर्ट’ मार्गावरील सेवा सुरू राहणार आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासाचे नियोजन करताना या मेगा ब्लॉकच्या वेळेची नोंद घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे.