Home क्रीडा Asian Games 2026: भारताचा सुवर्ण दिवस, बॉक्सिंगमध्ये धडाधड गोल्ड मेडलची कमाई

Asian Games 2026: भारताचा सुवर्ण दिवस, बॉक्सिंगमध्ये धडाधड गोल्ड मेडलची कमाई

0
Asian Games 2026: भारताचा सुवर्ण दिवस, बॉक्सिंगमध्ये धडाधड गोल्ड मेडलची कमाई
Asian Games 2026: भारताचा सुवर्ण दिवस, बॉक्सिंगमध्ये धडाधड गोल्ड मेडलची कमाई (Photo: ANI)

एशियन गेम्स 2026 स्पर्धेचा शेवटचा टप्पा सुरू असून भारतीय स्पर्धकांनी जबरदस्त झेप घेतली आहे. भारतासाठी स्पर्धेतील 13वा दिवस खास ठरला आहे. बॉक्सिंगमध्ये बारतने गोल्ड मेडलची हॅटट्रीक साधल आहे. लवलीना आणि परवीननंतर अंकुश पंघालने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. 80 किलो वजनी गटात अंकुश पंघालने सुवर्ण पदक पटकावलं. यासह भारताच्या खात्यात 15वं सुवर्ण पदक पडल आहे. 80 किलो वजनी गटात अंकुश पंघालचा साना दक्षिण कोरियाच्या किम मिनसियोंग याच्याशी झाला. या सामन्यात अंकुश पंघालने किमला कुठेच वरचढ होऊ दिलं नाही. या सामन्यात अंकुशने वेग, हालचाल आणि काउंटर पंचिंगचा जबरदस्त वापर केला. हा सामना सहज म्हणजेच 4-0 ने जिंकला. या विजयासह भारताने बॉक्सिंगमध्ये एकाच दिवसात तिसरं सुवर्ण पदक पटकावलं.

दिवसाच्या सुरुवातील लव्हलिनाने बॉक्सिंगमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. या भारतीय स्टारने अंतिम सामन्यात चिनी बॉक्सरला 5-0 ने पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. 2014 च्या ऑलिम्पिकनंतर महिलांच्या बॉक्सिंगमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. बॉक्सर परवीन हुड्डाने हीने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. अंतिम सामन्यात तिने चायनीज तैपेईच्या बॉक्सरला स्प्लिट डिसिजनने 3-2 असे पराभूत करून भारताला बॉक्सिंगमधील दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.

https://www.prahaar.in/2026/10/02/asian-games-2026-dheeraj-kumkum-historic-silver-mixed-recurve-archery/

कुस्ती प्रकारातही भारतीय स्पर्धकांनी जबरदस्त कामगिरी केली. कुस्तीपटू सुजीतने 65 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत 10-9 ने बाजी मारली आणि सुवर्ण पदक नावावर केलं. यासह कुस्तीत एकमेव सुवर्णपदक त्याच्या नावावर राहिलं.

तिरंदाजीत भारताने पुरुषांच्या रिकर्व्ह सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकले. गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत याच प्रकारात रौप्य पदक जिंकलेल्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात पुन्हा एकदा दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागला. भारताने मिश्र सांघिक रिकर्व्ह प्रकारात रौप्य पदक जिंकले. अंतिम सामन्यात भारताला चीनकडून ३-५ असा पराभव पत्करावा लागला. यावेळी कोरियाने अंतिम सामना 5-1 ने जिंकला. भारताच्या नेत्रा कुमारनने सेलिंगमध्ये कांस्यपदक जिंकले. तिने डिंगी प्रकारात भारताच्या पदकसंख्येत रौप्यपदकाची भर घातली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here