Home क्राईम Online Gambling : ऑनलाईन जुगाराच्या व्यसनापोटी डिलिव्हरी बॉय बनला सराईत गुन्हेगार; नवी मुंबई पोलिसांकडून नऊ गुन्हे उघडकीस

Online Gambling : ऑनलाईन जुगाराच्या व्यसनापोटी डिलिव्हरी बॉय बनला सराईत गुन्हेगार; नवी मुंबई पोलिसांकडून नऊ गुन्हे उघडकीस

0
Online Gambling : ऑनलाईन जुगाराच्या व्यसनापोटी डिलिव्हरी बॉय बनला सराईत गुन्हेगार; नवी मुंबई पोलिसांकडून नऊ गुन्हे उघडकीस
Maharashtra Police

नवी मुंबई : ऑनलाईन जुगाराच्या (Online Gambling) व्यसनापायी पैशांची गरज भागवण्यासाठी एका 24 वर्षीय डिलिव्हरी बॉयने साखळीचोरीचा मार्ग पत्करल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत उघडकीस आला आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेने (Navi Mumbai Crime Branch) कारवाई करत या तरुण चोराला अटक केली असून, त्याच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कुमार बाबू चव्हाण (वय 24, रा. डिलिव्हरी बॉय) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

कशी झाली कारवाई?

नवी मुंबई गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने सापळा रचून आरोपी कुमार बाबू चव्हाण याला एका ग्रे रंगाच्या टीव्हीएस एनटॉर्क (TVS Ntorq) स्कूटरवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना रंगेहात पकडले. चौकशीदरम्यान त्याने आपणच साखळीचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

स्थानिक माहितीचा गैरवापर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेशाने डिलिव्हरी बॉय असल्यामुळे कुमार बाबू याला सानपाडा, वाशी आणि कोपरखैराणे या परिसरातील रस्ते, गल्ल्या आणि शॉर्टकट मार्गांची अतिशय सखोल माहिती होती. याच स्थानिक माहितीचा फायदा घेऊन तो चोरी केल्यानंतर पोलिसांच्या नजरेतून सहज पसार होत असे.

लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली स्कूटर तसेच एकूण 68.84 ग्रॅम वजनाचे आठ सोन्याचे मंगळसूत्र आणि साखळ्या जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या या ऐवजाची एकूण किंमत 17.92 लाख रुपये इतकी आहे.

https://www.prahaar.in/2026/10/01/an-obsessive-urge-to-impress-a-female-friend-stole-three-two-wheelers-for-a-joyride-police-crack-down-hard/

ऑनलाईन जुगाराचे व्यसन ठरले कारणीभूत

तपासादरम्यान असे समोर आले की, कुमार बाबू याला ऑनलाईन जुगार खेळण्याचे भीषण व्यसन जडले होते. या जुगारात वारंवार होणाऱ्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी आणि पैशांची चटकन गरज भागवण्यासाठी त्याने साखळीचोरीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली होती. नवी मुंबई पोलिसांनी या कारवाईमुळे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आणले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here