Home क्रीडा आयसीसी क्रिकेटचे अनेक नियम बदलले, जाणून घ्या नेमकं काय?

आयसीसी क्रिकेटचे अनेक नियम बदलले, जाणून घ्या नेमकं काय?

0
आयसीसी क्रिकेटचे अनेक नियम बदलले, जाणून घ्या नेमकं काय?
आयसीसी क्रिकेटचे अनेक नियम बदलले, जाणून घ्या नेमकं काय? (Photo: ICC)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने क्रिकेट खेळाला आणखी रोमांचक, वेगवान आणि पारदर्शक बनवण्यासाठी नियमांमध्ये आणि खेळण्याच्या अटींमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. यामुळे क्रिकेट सामन्याचा वेग आणि अचूक निर्णय क्रीडाप्रेमींना अनुभवता येणार आहेत. हे नवीन नियम 1 ऑक्टोबर 2026 किंवा त्यानंतर सुरू होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय मालिकांना लागू होतील मात्र, सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय मालिका जुन्या नियमांनुसारच पूर्ण केल्या जातील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेला हे नवीन नियम लागू होणार नाहीत.

आयसीसीने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटसाठी जाहीर केलेले नवीन नियम खालीलप्रमाणे आहेत:

1. वेळ वाया घालवल्यास फलंदाजाला दंड : जर एखादा फलंदाज निर्धारित वेळेत चेंडूचा सामना करण्यास तयार झाला नाही किंवा त्याने वेळ वाया घालवला, तर पहिल्या दोन चुकांवर ताकीद दिली जाईल. तिसऱ्यांदा हीच चूक केल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ५ पेनल्टी धावा दिल्या जातील.

2. चेंडूचे मानकीकरण : पुरुष क्रिकेटप्रमाणेच आता महिला आणि ज्युनियर क्रिकेटसाठी चेंडूंच्या वजन आणि आकाराच्या तीन वेगवेगळ्या श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत. यामुळे उत्पादनात सुसूत्रता येईल.

3. मिसफिल्ड आणि ओव्हरथ्रो स्पष्टता: चेंडू अडवताना किंवा तो दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडे फेकता (पास करताना) झालेली कोणतीही चूक ही ‘मिसफिल्ड’ मानली जाईल, त्याला ‘ओव्हरथ्रो’ म्हटले जाणार नाही.

4. डेड बॉल ठरवण्याचे पंचांचे स्वातंत्र्य: चेंडू कधी ‘डेड’ किंवा स्थिर झाला आहे, हे ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आता मैदानावरील पंचांना असेल. चेंडू गोलंदाजाच्या किंवा यष्टीरक्षकाच्या हातात असण्याची अट आता नसेल.

5. रन-आउट आणि यष्टीचीतसाठी नवा नियम: फलंदाजाला धावबाद किंवा यष्टीचीत करण्यासाठी क्षेत्ररक्षकाचे चेंडूवर पूर्ण नियंत्रण असणे आवश्यक आहे. केवळ हाताने चेंडूला स्पर्श करणे किंवा चेंडू स्टंपला लागणे पुरेसे मानले जाणार नाही.

https://www.prahaar.in/2026/10/01/abhishek-sharma-took-three-consecutive-wickets-at-the-2026-asian-games-but-it-was-not-a-hat-trick-heres-why/

6. कसोटी क्रिकेटमधील महत्त्वाचे बदल

• गुलाबी चेंडूचा वापर : अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ खंडित होण्याची समस्या सोडवण्यासाठी, दोन्ही संघांच्या परस्पर संमतीने दिवसाच्या सामान्य कसोटी सामन्यांमध्येही गुलाबी चेंडू वापरला जाऊ शकतो.

• दिवसाचे शेवटचे षटक पूर्ण होणार: कसोटी सामन्यात दिवसाच्या शेवटच्या षटकात जर विकेट पडली आणि काही चेंडू शिल्लक असतील, तर खेळ आपोआप संपणार नाही . उरलेले चेंडू त्याच दिवशी टाकून ते षटक पूर्ण केले जाईल.

7. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील नियम

• वाईड बॉलचा नवीन संदर्भ बिंदू: व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजाने चेंडू टाकताना फलंदाजाच्या पायाची जी सुरुवातीची स्थिती असेल, तीच वाईड चेंडूसाठी संदर्भ बिंदू मानली जाईल. फलंदाज नंतर ऑफ स्टंपच्या दिशेने सरकला तरी मूळ स्थितीच गृहीत धरली जाईल.

• मुख्य प्रशिक्षकांना मैदानावर येण्याची परवानगी: एकदिवसीय आणि टी20 सामन्यांमधील ड्रिंक्स ब्रेकदरम्यान मुख्य प्रशिक्षकांना मैदानावर येऊन खेळाडूंना रणनीती सांगण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे.

• टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील ब्रेक: टी20 सामन्यांमध्ये दोन डावांच्या दरम्यानचा वेळ 15 मिनिटांचा निश्चित करण्यात आला आहे. मात्र, सामन्यात वेळ वाया गेला असल्यास हा ब्रेक 10 मिनिटांपर्यंत कमी केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here