Home टेक्नॉलॉजी Vivo X Fold 6 भारतात येतोय! किंमत लीक; फीचर्सही जबरदस्त

Vivo X Fold 6 भारतात येतोय! किंमत लीक; फीचर्सही जबरदस्त

0
Vivo X Fold 6 भारतात येतोय! किंमत लीक; फीचर्सही जबरदस्त
Vivo X Fold 6 भारतात येतोय! किंमत लीक; फीचर्सही जबरदस्त(photo: Tech Updates/facebook)

विवोने चीनमध्ये धमाकेदार लाँच केल्यानंतर आता आपल्या बहुप्रतिक्षित विवो एक्स फोल्ड 6 (Vivo X Fold 6) या फोल्डेबल स्मार्टफोनच्या जागतिक आणि भारतीय बाजारातील पदार्पणाची तयारी पूर्ण केली आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका युरोपियन रिटेलरच्या वेबसाईटवरील प्री-ऑर्डर लिस्टिंगमुळे या प्रीमियम फोनच्या आंतरराष्ट्रीय किंमत आणि रंगांबाबतची महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. चीनमधील लाँचच्या तुलनेत जागतिक बाजारात याच्या स्पेसिफिकेशन्समध्ये आणि रंगांच्या पर्यायांमध्ये काही बदल पाहायला मिळणार आहेत.

युरोपियन बाजारात विवो एक्स फोल्ड 6 चा ग्लोबल व्हेरिएंट 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेजसह सूचीबद्ध करण्यात आला आहे. टेक युटूबरने सर्वप्रथम ही माहिती समोर आणली असून, चिनी मॉडेलप्रमाणे हा फोन अनेक रंगांमध्ये उपलब्ध असण्याऐवजी केवळ काळ्या आणि निळ्या रंगाच्या पर्यायांमध्येच लाँच केला जाण्याची शक्यता आहे. युरोपियन रिटेलर ‘एप्टो’च्या सूचीनुसार, व्हॅटसह या फोनची किंमत 2,135 युरो म्हणजेच अंदाजे 2,33,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर व्हॅट वगळता ही किंमत सुमारे 1,750 युरो म्हणजेच अंदाजे 1,90,000 रुपयांच्या घरात असेल. चिनी मॉडेलमधील 7,000mAh च्या तुलनेत ग्लोबल व्हेरिएंटची बॅटरी क्षमता 6,900mAh इतकी थोडी कमी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

https://www.prahaar.in/2026/09/29/ai-industry-faces-major-financial-challenge-6-trillion-revenue-needed-by-2031/

दुसरीकडे, भारतीय बाजारात हा फोन 6 ऑक्टोबर रोजी लाँच होण्याची दाट शक्यता असून, तो दोन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध होऊ शकतो. यात 12 जीबी रॅमसह 256 जीबी आणि 512 जीबी चे पर्याय असतील. भारतीय ग्राहकांसाठी हा फोन प्रिझम ब्लॅक आणि नेबुला टील या आकर्षक रंगांमध्ये सादर केला जाईल आणि तो विवोच्या लेटेस्ट ओरिजिनओएस 7 (OriginOS 7) वर चालेल अशी चर्चा आहे. चीनमध्ये या फोनचे अनेक व्हेरिएंट्स आणि एक विशेष ब्लॅक गोल्ड एडिशन उपलब्ध आहे, जिथे बेस मॉडेलची किंमत CNY 7,999 (अंदाजे रु. 1,11,000) पासून सुरू होते. जागतिक लाँचची तारीख जवळ येत असताना टेक प्रेमींमध्ये या फोल्डेबल फोनबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.(Vivo X Fold 6 launch)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here