Home क्रीडा शुभमन गिलची बॅट पुन्हा चमकली! ODI मध्ये 200 धावा; पाठलाग करताना द्विशतक झळकावणारा पहिला आशियाई फलंदाज

शुभमन गिलची बॅट पुन्हा चमकली! ODI मध्ये 200 धावा; पाठलाग करताना द्विशतक झळकावणारा पहिला आशियाई फलंदाज

0
शुभमन गिलची बॅट पुन्हा चमकली! ODI मध्ये 200 धावा; पाठलाग करताना द्विशतक झळकावणारा पहिला आशियाई फलंदाज
Photo: ANI

नवी दिल्ली: संपूर्ण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण आला आहे. कर्णधार शुभमन गिलने आपल्या खेळीने विक्रमी धावांचा डोंगर रचला आहे. कर्णधार शुभमन गिलने दुसऱ्या वनडे सामन्यात 200 धावा पूर्ण केल्या आहेत. ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिलने सामन्याचे खरे हिरो ठरले आहेत. वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यामध्ये टीम इंडियासमोर 406 धावांचं आव्हान आहे. 200 धावांची विक्रमी खेळी केल्यानंतर शुभमन गिलच्या फॅन्सकडून कौतुकाचं वर्षाव होत आहे.

भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवत विक्रमी द्विशतकी खेळी केली. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना गिलने आक्रमक आणि संयमी फलंदाजीचा सुरेख मिलाफ साधत 200 धावांचा टप्पा पार केला. या खेळीमुळे त्याच्या नावावर आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली.

गिलसाठी वनडे क्रिकेटमधील हे दुसरे द्विशतक आहे. याआधी त्याने 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 208 धावांची खेळी केली होती. त्या वेळी तो पुरुषांच्या वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज ठरला होता.

वनडे क्रिकेटमध्ये द्विशतकांचा विचार केला तर भारताचा रोहित शर्मा सर्वाधिक तीन द्विशतकांसह आघाडीवर आहे. रोहितने 264, 209 आणि 208 धावांच्या खेळी केल्या आहेत. याशिवाय मार्टिन गप्टिल 237*, वीरेंद्र सेहवाग 219, ख्रिस गेल 215, फखर जमान 210*, इशान किशन 210 आणि पथुम निसांका 210* या फलंदाजांनीही द्विशतके झळकावली आहेत.

https://www.prahaar.in/2026/09/30/rohit-sharma-scores-a-century-against-west-indies-stakes-his-claim-for-the-odi-world-cup-2027/

गिलची ही कामगिरी त्याच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे आणखी एक उदाहरण ठरली आहे. ICCच्या नोंदीनुसार गिलने वनडेमध्ये 2000 धावांचा टप्पाही वेगाने गाठला असून तो या विक्रमातील आघाडीच्या फलंदाजांपैकी एक आहे.

या सामन्यातील द्विशतकामुळे गिलने केवळ वैयक्तिक विक्रमाची भर घातली नाही, तर भारताच्या मोठ्या धावसंख्येच्या पाठलागाला निर्णायक दिशा दिली. त्यामुळे गिलची ही खेळी भारतीय वनडे क्रिकेटमधील आणखी एका संस्मरणीय डावाच्या रूपात नोंदली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here