Home क्रीडा Asian Games 2026 : भारत फायनलमध्ये! दक्षिण कोरियाचा 2-0 ने पराभव; सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर

Asian Games 2026 : भारत फायनलमध्ये! दक्षिण कोरियाचा 2-0 ने पराभव; सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर

0
Asian Games 2026 : भारत फायनलमध्ये! दक्षिण कोरियाचा 2-0 ने पराभव; सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर
भारत फायनलमध्ये! दक्षिण कोरियाचा 2-0 ने पराभव; सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर(Photo: hockey india/X)

नागोया (जपान) : भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा 2-0 ने पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाने आपली उत्कृष्ट कामगिरी कायम राखत सुवर्णपदकाचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. आता 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत भारतासमोर चीनचे आव्हान असेल, ज्यामुळे 44 वर्षांची सुवर्णपदकाची प्रतीक्षा संपवण्याची भारताकडे सुवर्णसंधी आहे.(Indian Women Hockey Final)

संघाची दमदार कामगिरी आणि गोलरचना

उपांत्य फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच मजबूत बचाव केला. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये दोन्ही बाजूंना गोल करण्यात अपयश आले आणि पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत संपला. भारताला पहिल्या क्वार्टरमध्ये तब्बल नऊ पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु कोरियाच्या भक्कम बचावामुळे त्याचे गोलमध्ये रूपांतर करणे भारताला जमले नाही.

तथापि, तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आक्रमक पवित्रा घेत सामन्याची दिशा बदलली. 44 व्या मिनिटाला फॉरवर्ड खेळाडू इशिकाने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये सुंदर रूपांतर करून भारताला 1-0 अशी बहुमूल्य आघाडी मिळवून दिली. या धक्क्यातून दक्षिण कोरिया सावरण्यापूर्वीच, अवघ्या चार मिनिटांनंतर 48 व्या मिनिटाला सुनेलिता टोपोने एका शानदार मैदानी गोल करत भारताची आघाडी 2-0 अशी दुप्पट केली. कोरियाला सामन्यात पुनरागमन करण्यासाठी अखेरपर्यंत संघर्ष करावा लागला, पण त्यांना एकही गोल नोंदवता आला नाही.

https://www.prahaar.in/2026/09/30/asian-games-javelin-rumesh-rohit-yadav-jersey-swap/

ऐतिहासिक सुवर्णपदकाची प्रतीक्षा संपवण्याची संधी

या विजयासह भारतीय महिला संघाने फायनलचे तिकीट पक्के केले असून आता संपूर्ण देशाचे लक्ष 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या चीनविरुद्धच्या महामुकाबल्यावर लागले आहे. मागील अनेक दशकांपासून आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याचे भारतीय महिलांचे स्वप्न या विजयाने प्रत्यक्षात उतरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.(Indian Women Hockey Final)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here