Home महाराष्ट्र नाशिक Ashok Kharat Case : तोंडाला मास्क अन् पोलिसांचा गराडा, अशोक खरात ओळखूही येईना; आज कोर्टात काय घडलं ?

Ashok Kharat Case : तोंडाला मास्क अन् पोलिसांचा गराडा, अशोक खरात ओळखूही येईना; आज कोर्टात काय घडलं ?

0
Ashok Kharat Case : तोंडाला मास्क अन् पोलिसांचा गराडा, अशोक खरात ओळखूही येईना; आज कोर्टात काय घडलं ?

Ashok Kharat Case : अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि अघोरी कृत्ये करणाऱ्या अशोक खरातच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीय. राज्यभर चर्चेत असलेला भोंदू अशोककुमार खरात (वय ६७, रा. गोविंदनगर) आणखी एका प्रकरणात अडकला असून व्यवसायाच्या भरभराटीसाठी दैवी मंत्र टाकून पुष्कराज रत्न सोन्याच्या अंगठ्यांमध्ये बसवून देण्याचे आमिष दाखवत अहिल्यानगरच्या कापड व्यावसायिकाची त्याने फसवणूक केली होती.

बुधवारी अनेक महिन्यानंतर त्याला प्रत्यक्ष जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश बाबर यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून खरात यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. दरम्यान सुनावणीसाठी कोर्टात आलेल्या भोंदू अशोक खरातने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला होता तर तोंडाला मास्क देखील लावलेले होते त्यामुळे तो ओळखूही येत नव्हता.

अहिल्यानगरचं प्रकरण काय ?

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील कापड व्यावसायिकाला नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथील ‘ओकस् प्रॉपर्टीज’ कार्यालयात बोलावून खरात याने २०२२ ते २०२६ या कालावधीत व्यवसायाच्या भरभराटीसाठी दैवी मंत्र टाकून पुष्कराज रत्न सोन्याच्या अंगठ्यांमध्ये बसवून देण्याचे सांगितले. त्यानुसार २० ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या घेतल्यानंतर बनावट पितळी अंगठ्यांमध्ये रत्न बसवून त्या परत दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. याशिवाय खरात याने विविध कारणे सांगून फिर्यादीकडून २ लाख ६२ हजार रुपयांची रोख रक्कम उकळल्याचे तक्रारीत नमूद आहे.

https://www.prahaar.in/2026/09/29/nashik-crime-bizarre-ritual-in-nashik-fraudulent-woman-arranges-her-sons-engagement-to-a-young-woman-by-instilling-fear-of-black-magic/

एका खड्याच्या मोबदल्यात ७५ हजार रुपये

भोंदू खरातने एका खड्याच्या मोबदल्यात ७५ हजार रुपये घेतल्याचाही आरोप आहे. खरात याच्यावर पोलिसांनी कारवाई केल्याचे १९ मार्च रोजी समजल्यानंतर फिर्यादीने अंगठ्यांची पडताळणी केली, त्यावेळी त्या अंगठ्या बनावट व पितळी धातूच्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २७ मार्च रोजी व्यापाऱ्याने सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान बुधवारी (दि. ३०) त्याला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायाधीश बाबर यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून खरात यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील करीत आहेत. दरम्यान, एका अजामीनपात्र गुन्ह्यात जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच खरात यास पुन्हा फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिस कोठडी मिळाल्याने त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here