भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवचं नशिब 38व्या वर्षी फळफळलं आहे. कारण त्याने या वयात नव्या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. पंजाब त्याला तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळण्याची संधी देणार आहे. पंजाबने उमेश यादवला गेस्ट प्लेयर म्हणून देशांतर्गत क्रिकेट पर्वासाठी करारबद्ध केलं आहे. खरं तर उमेश यादवचं करिअर जवळपास शेवटच्या टप्प्यात आहे. गेल्या काही वर्षांपासून टीम इंडिया आणि आयपीएलची दारं त्याच्यासाठी बंद झाली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघानेही त्याला डावललं आहे. असं असताना उमेश यादव आता पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसणार आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमरजीत सिंह मेहता यांनी उमेश यादवला संघात घेतल्यानंतर सांगितलं की, तो संघात आल्याने गोलंदाजी आणखी भक्कम होणार आहे.
उमेश यादवला पंजाबने संधी देण्याचं कारण की…
देशांतर्गत क्रिकेटमधील रणजी ट्रॉफी स्पर्धेत मागच्या 33 वर्षात पंजाबने जेतेपद मिळवलेलं नाही. शेवटची रणजी ट्रॉफी पंजाबने 1992-93 मध्ये मिळवली होती. त्यानंतर 1994-95 आणि 2004-05 मध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र या शिवाय पंजाबच्या पदरी निराशाच पडली आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वात पंजाब क्रिकेट असोसिएशनने संघ बांधणीकडे जोर दिला आहे. रिपोर्टनुसार, शुभमन गिल येणाऱ्या देशांतर्गत स्पर्धेत एक सामना खेळण्याची शक्यता आहे. तसेच गुरनूर ब्रार आणि अर्शदीप सिंहनही या संघात असतील. त्यामुळे उमेश यादवसारख्या अनुभवी गोलंदाजामुळे पंजाब किंग्सचा गोलंदाजीचा मारा अधिक प्रभावी होईल.
Big Breaking….!!🚨
– Umesh Yadav is playing for Punjab in the upcoming domestic season.
— Cricket Central (@CricketCentrl) September 30, 2026
https://www.prahaar.in/2026/09/30/four-year-ban-for-failing-to-provide-a-blood-sample-now-john-campbell-has-smashed-a-century-against-india/
उमेश यादवची क्रिकेट कारकिर्द
उमेश यादव भारतासाठी 57 कोटी सामने खेळला आहे. यात त्याने 170 विकेट काढल्या आहेत. उमेश यादवच्या वनडेत 106 विकेट त्याच्या नावावर आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने 124 वनडे सामन्यात 380 विकेट काढल्या आहेत. उमेश यादव शेवटचा वनडे साना 2023 मध्ये खेळला होता. तर आयपीएलमध्ये 2024च्या पर्वात खेळला होता. आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबकडून खेळणार आहे. पंजाबच्या गोलंदाजांना त्याच्या अनुभवाचा फायदा होणार आहे. उमेश यादव मधल्या काळात क्रिकेट समालोचकाच्या भूमिकेतही दिसला होता. आता पंजाबकडून खेळताना कशी कामगिरी करतो, याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.