Home क्रीडा Asian Games 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पाकिस्तान लढत होणार? उपांत्य फेरीचं गणित समजून घ्या

Asian Games 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पाकिस्तान लढत होणार? उपांत्य फेरीचं गणित समजून घ्या

0
Asian Games 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पाकिस्तान लढत होणार? उपांत्य फेरीचं गणित समजून घ्या
Asian Games 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पाकिस्तान लढत होणार? उपांत्य फेरीचं गणित समजून घ्या (Photo: ANI)

जापानच्या आइची नगोया येथे एशियन गेम्स 2026 स्पर्धा सुरू असून पुरूष क्रिकेट स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चारही संघ ठरले आहेत. काहीही मेहनत न घेता चार संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळालेलं आहे. पावसामुळे उपांत्यपूर्व फेरीचे सामने झालेच नाहीत. पावसामुळे आउटफिल्ड ओली असल्याने हे सामने होऊ शकले नाहीत. त्यामुळे आयसीसी मानांकनाच्या आधारावर चार संघांना फायदा झाला आणि उपांत्य फेरीत धडक मारली. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता या चारही संघांचं उपांत्य फेरीतील गणित ठरलं आहे. पण कोणता संघ कोणाशी लढणार हा प्रश्न आहे. तसेच हे सामने कधी होतील याबाबतही क्रीडाप्रेमींना उत्सुकता आहे. तर उपांत्य फेरीचे दोन्ही सामने 1 ऑक्टोबरला खेळले जाणार आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी साडे पाच वाजता होईल. तर भारत श्रीलंका दुसरा उपांत्य फेरीचा सामना सकाळी साडे दहा वाजता होईल.

उपांत्य फेरीत पाऊस पडला तर काय?

उपांत्य फेरीच्या सामन्यात पाऊस पडला आणि सामने झाले नाही तर अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळणार? पहिला उपांत्य फेरीचा सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. हा सामना पावसामुळे बाधित झाला तर अंतिम फेरीचं तिकीट पाकिस्तानला मिळेल. कारण बांगलादेशच्या तुलनेच पाकिस्तानचं आयसीसी मानांकन चांगलं आहे. पाकिस्तानचा संघ सहाव्या, तर बांगलादेशचा संघ आठव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, भारत श्रीलंका सामन्यात पाऊस पडला तर भारताचा अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. कारण भारतीय संघ आयसीसी मानांकनात पहिल्या स्थानावर, श्रीलंकेचा संघ नवव्या स्थानावर आहे.

https://www.prahaar.in/2026/09/28/virat-kohli-has-won-60-matches-in-his-86-centuries-big-record-in-cricket/

…तर अंतिम फेरीत भारत पाकिस्तान सामना

उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तान यांनी त्यांचे सामने जिंकले तर अंतिम फेरीत हायव्होल्टज सामना पाहायला मिळेल. जेतेपदासाठी भारत आणि पाकिस्तान हे दोन उभे ठाकतील. पावसामुळे व्यत्यय येऊन उपांत्य फेरीचे सामने रद्द झाले तरी भारत पाकिस्तान लढत होणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या नजरा आता उपांत्य फेरीच्या सामन्याकडे लागून आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here