हिंदू धर्मात शारदीय नवरात्रोत्सवचं विशेष महत्त्व आहे. या नऊ दिवसात देवीचा जागर केला जातो. देवीच्यी नऊ रुपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. घरोघरी देवीचे घट मांडले जातात आणि त्याचं पूजन होतं. त्यामुळे या नऊ दिवसात चैतन्यमय वातावरण असतं. धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रोत्सवात देवीची उपासना केल्याने नकारात्मक उर्जेचा नाश होतो आणि सकारात्मक उर्जा अनुभवायला मिळते. घरात सुख समृद्धीचा वास होतो, अशी भक्तांची भावना असते. भाविक आपल्या श्रद्धेनुसार व्रतवैकल्य करतात. काही जणं नऊ दिवस उपवास ठेवतात, तसेच अनवाणी राहतात. भाविक आपल्या श्रद्धेनुसार देवीची भक्ती करतात. यंदा नवरात्रीची विशेष आहे. पंचांगातील गणनेनुसार एक योग जुळून आला आहे. त्यामुळे भक्तांमध्ये तारखांबाबत थोड संभ्रम आहे. या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला पुढे मिळतील. चला जाणून घेऊयात नवरात्रोत्सवाला सुरूवात कधी होणार आणि अष्टमी-नवमी तिथी एकाच दिवशी का पडली ते..
कधी सुरू होणार नवरात्रोत्सव? अष्टमी-नवमी तिथीचं काय?
पंचांगानुसार, शारदीय नवरात्रीला 11 ऑक्टोबर, रविवारपासून सुरूवात होणार आहे. अश्विन महिन्याच्या प्रतिपदेला घटस्थापना होईल. त्यानंतर नवरात्रोत्सवर 19 ऑक्टोबरला असेल.म्हणजेच यंदा नवरात्रोत्सव नऊ दिवस असणार आहे. तर 20 ऑक्टोबरला दसरा असणार आहे. पण नवरात्रोत्सवर नऊ दिवसांचा असला तरी 19 ऑक्टोबरला अष्टमी आणि नवमीची तिथी आहे. पंचांगानुसार, अष्टमी तिथीला 18 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजून 27 मिनिटांना सुरूवात होईल. ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 ऑक्टोबरच्या सकाळी 10 वाजून 51 मिनिटांपर्यंत राहिल. त्यानंतर नवमी तिथी सुरू होईल. म्हणजे 19 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजून 51 मिनिटांपर्यंत अष्टमी तिथी असेल.
https://www.prahaar.in/2026/09/29/sharadiya-navratri-2026-10-when-does-sharadiya-navratri-2026-begin-october-10-or-11/
19 ऑक्टोबरला दोन्ही तिथी एकत्र असल्यानने अष्टमी आणि नवमी संदर्भातील दोन्ही धार्मिक विधी त्याच दिवशी केल्या जातील. म्हणजेच या दिवशी दुर्गाष्टमी, महागौरी पूजा, कन्या पूजन आणि महानवमी पूजन केलं जाईल. त्यामुळे 19 ऑक्टोबर 2026 हा दिवस खास आणि महत्त्वाचा असणार आहे. या दिवशी अष्टमीशी निगडीत होम होईल. इतकंच काय तर नवमी तिथीही त्याच दिवशी सुरू होणार असल्याने महागौरी पूजा, दुर्गाष्टमी, कन्या पूजन आणि इतर धार्मिक कार्य पार पाडली जातील.