Home ब्रेकिंग न्यूज Sarathi Sanstha: ‘सारथी’ला 122 कोटी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला 150 कोटी

Sarathi Sanstha: ‘सारथी’ला 122 कोटी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला 150 कोटी

0
Sarathi Sanstha: ‘सारथी’ला 122 कोटी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला 150 कोटी
फोटो सौजन्य: सारथी संस्था फेसबूक

मुंबई: मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा आणि वसतिगृहांची उभारणी करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेला (सारथी) 122 कोटी 34 लाख 60 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी 150 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी दिली.

https://www.prahaar.in/2026/09/29/nashik-investigation-into-shalarth-id-scam-gains-momentum-10-teams-comprising-40-police-officers-deployed/

सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना विविध शैक्षणिक आणि सामाजिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीचाही लाभ दिला जातो. सारथीच्या वसतिगृहांच्या बांधकामासाठी 122 कोटी 34 लाख 60 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्याचा शासन आदेश निर्गमित करण्यात आल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्यात 500 विद्यार्थी आणि 500 विद्यार्थिनींच्या क्षमतेची आठ वसतिगृहे उभारण्यात येत आहेत. वसतिगृहांचे बांधकाम सध्या पूर्णत्वास जात असून, पुढील शैक्षणिक वर्षापासून ती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

https://www.prahaar.in/2026/09/29/food-poisoning-caused-by-bhel-chutney-at-a-weekly-market-number-of-patients-reaches-186-stir-in-malegaon/

दरम्यान, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी अर्थसंकल्पात 750 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी यापूर्वी 450 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. आता आणखी 150 कोटी रुपये महामंडळाला उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here