Home ब्रेकिंग न्यूज Pune Fire News : पुण्यात लक्ष्मी रस्त्यावरील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली!

Pune Fire News : पुण्यात लक्ष्मी रस्त्यावरील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली!

0
Pune Fire News : पुण्यात लक्ष्मी रस्त्यावरील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली!
Pune Fire News Source- X

पुणे : पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील (Laxmi Road) शगुन चौक परिसरात असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या (Bank Of India Building) इमारतीला मंगळवारी दुपारी अचानक भीषण आग लागली. भरदुपारी आणि वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या बँकेच्या कार्यालयात ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशामक दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे काम हाती घेतले.

https://www.prahaar.in/2026/09/29/i-want-to-put-this-medal-around-my-mother8217s-neck8221-neeru-dhanda-after-historic-asian-games-trap-shooting-gold/

सुरुवातीला अग्निशामक दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र, आगीची तीव्रता पाहता गाड्यांची संख्या ७ वर वाढवण्यात आली. मुख्य अग्निशामक अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या आगीत बँकेच्या कार्यालयातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, आग नक्की कशामुळे लागली याचे मूळ कारण अजून स्पष्ट झालेले नाही. आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतरच आगीचे कारण आणि एकूण नुकसानाची माहिती समोर येईल, असे अग्निशामक अधिकाऱ्यांनी सांगितले. लक्ष्मी रस्ता हा पुण्यातील प्रमुख व्यापारी मार्ग असल्याने आग लागल्याचे समजताच तिथे नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि आजूबाजूच्या दुकानांना धोका निर्माण होऊ नये म्हणून अग्निशामक दलाचे पथक सतत सतर्कतेने काम करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here