Home ब्रेकिंग न्यूज FDA Action: कसारा घाटात एफडीएने पाठलाग करत 1 कोटी 26 लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत, गुप्त माहितीच्या आधारे रचला प्लॅन

FDA Action: कसारा घाटात एफडीएने पाठलाग करत 1 कोटी 26 लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत, गुप्त माहितीच्या आधारे रचला प्लॅन

0
FDA Action: कसारा घाटात एफडीएने पाठलाग करत 1 कोटी 26 लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत, गुप्त माहितीच्या आधारे रचला प्लॅन

ठाणे: अन्न- औषध प्रशासनाकडून (FDA)सोमवारी 27 सप्टेंबर 2026 रोजी, संपूर्ण राज्यात प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या चोरट्या वाहतुकीविरुद्ध एक मोठी कारवाई केली आहे. अन्न व औपध प्रशासनाला मिळालेल्या अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सोमवारी पालघर मार्गे 2 ट्रक प्रतिबंधित अन्नपदार्थ घेऊन भिवंडी, ठाणे येथे जाणार असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली होती.

https://www.prahaar.in/2026/09/29/%e2%82%b96-11-crore-donated-to-lalbaugcha-raja-offered-items-to-be-publicly-auctioned/

पहिली गाडी चारोटी टोल नाक्याजवळ जेरबंद करण्यात एफडीए प्रशासनाला यश आलं. काल ठाणेचे विशेष पथक पालघर परिसरात छापा टाकण्यासाठी दबा धरून बसले होते. सोमवारी 28 सप्टेंबर रोजी सकाळी 07.04 वाजता पहिली संशयास्पद MH 43 Y 7911 गाडी चारोटी टोल नाका ओलांडून पुढे जाताच पथकाने थांबवून तिची झाडाझडती घेतली. तपासणी दरम्यान ट्रकमधून 50 लाखांचा मुद्देमाल आढळून आला. त्या गाडीमध्ये प्रतिबंधित गुटखा मोठ्या प्रमाणावर होता. गाडीची झाडाझडती घेतल्यानंतर ठाणे पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलेय.

https://www.prahaar.in/2026/09/29/dead-rat-found-in-mumbai-borivali-west-masala-dosa-in-restaurant-customer-demands-police-led-food-safety-investigation/

दुसऱ्या ट्रकचा आचाड नाक्यावरून पळ काढण्याचा प्रयत्न होता. पहिली गाडी पकडली गेल्याचे लक्षात येताच, काही अंतरावरून मागून येत असलेल्या MH 48 DQ 3624 ह्या दुसऱ्या गाडीच्या चालकाने आचाड नाका (पालघर) येथून तात्काळ गाडी यु-टर्न घेऊन पुन्हा गुजरात राज्याच्या हद्दीत पळवून नेण्याचा प्रयत्न करत होता. काही वेळानंतर ही गाडी गुजरातमधून नाशिक-कसारा मार्गे भिवंडी, ठाणे येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार, तात्काळ, दुसरे पथक कसारा घाटाकडे रवाना करण्यात आले. त्यानंतर, दुपारी 12.45 वाजेच्या सुमारास कसारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत (जिल्हा ठाणे) दुसरी गाडी अडवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा आढळून आला.

https://www.prahaar.in/2026/09/29/first-steel-bridge-set-up-in-maharashtra-thane-district-bhiwandi-taluka-dive-anjur-village-for-bullet-train-project/

संपूर्ण राज्यात प्रतिबंधित करण्यात आलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या चोरट्या वाहतूक व साठवणुकीविरुद्ध अन्न- औषध प्रशासनाने दोन स्वतंत्र ठिकाणी मोठी कारवाई केली आहे. या दोन्ही कारवायांत मिळून एकूण 85 लाख 64 हजार 400 रूपयांच्या किंमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आणि 41 लाख किंमतीचे दोन बंदिस्त आयशर ट्रक असा एकूण 1 कोटी 26 लाख 64 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कसारा पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरुद्ध रीतसर गुन्हा नोंदवून मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अन्न- औषध प्रशासनामार्फत प्रतिबंधित अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री करणाऱ्या दुकानांविरोधात नियमितपणे तपासणी व कायदेशीर कारवाई केल्या जात आहेत.

दरम्यान, विनापरवाना अन्न व्यवसाय आणि निकृष्ट दर्जाच्या संशयावरून बुलढाणा जिल्ह्यातील एका कंपनीवर धडक कारवाई केली आहे. बुलढाणा विभागाच्या अन्न- औषध प्रशासनामार्फत सोमवारी 28 सप्टेंबर मे. एएम ओएल्स प्रायव्हेट लिमिटेड (Am Oels Private Limited)या आस्थापनेवर धडक तपासणी व कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान आस्थापनेत साठवणूक करण्यात आलेल्या सुट्या रिफाइंड सोयाबीन तेलाचे नियमित अन्न नमुने विश्लेपणासाठी घेण्यात आले. वैध अन्न परवान्याशिवाय अन्न व्यवसाय चालवत असल्याचे तसेच साठ्याचा दर्जा निकृष्ट असल्याचा संशय असल्याच्या कारणास्तव, उर्वरित रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा – एकूण २,४८,८४५.४०० किलो, अंदाजे किंमत रु. ३,५०,८७,२०१.४०/- (रु. ३.५१ कोटी) जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या साठ्याचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर तसेच विनापरवाना व्यवसाय चालविल्याप्रकरणी संबंधित आस्थापनेविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ व त्याअंतर्गत लागू नियम व विनियमांनुसार आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here